माईंड स्पेस येथे महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 19:22 IST2018-10-15T19:14:19+5:302018-10-15T19:22:07+5:30

हा मृतदेह आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास माईंड स्पेस येथील डबल रोडवर आढळून आला आहे.  याबाबत बांगूर नगर पोलीस अधिक तपास करत आहेत. 

The body of the woman was discovered at Mind Space | माईंड स्पेस येथे महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ 

माईंड स्पेस येथे महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ 

मुंबई - मालाड येथील माईंड स्पेसपरिसरातील डबल रोड येथे  एका ट्रॅव्हल बॅगेत मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. बांगूर नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगाव येथील  सिद्धार्थ रुग्णालयात पाठविला आहे.  

बांगूर नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा मृतदेह एका २० ते २५ वर्षीय महिलेचा असून या मृतदेहाच्या गळ्याभोवती दोरखंड असलेल्या अवस्थेत पोलिसांना हा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास माईंड स्पेस येथील डबल रोडवर आढळून आला आहे.  याबाबत बांगूर नगर पोलीस अधिक तपास करत आहेत. बांगूर नगर पोलीस अशा प्रकारच्या महिलेची कोणत्या पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार आहे का? याची चौकशी करत आहे. 

Web Title: The body of the woman was discovered at Mind Space