खारघरमध्ये बुडालेल्या चौथ्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 14:41 IST2019-08-05T14:39:05+5:302019-08-05T14:41:11+5:30
वाहून गेलेल्या चार मृतदेहांपैकी तीन मृतदेह खारघरमध्येच घटनास्थळी शनिवारी सापडले होते.

खारघरमध्ये बुडालेल्या चौथ्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला
पनवेल - खारघरमधून वाहून गेलेल्या नेहा दमाचा मृतदेह बेलापूर खाडीत सापडला आहे. शनिवारी ओढ्यातून वाहून गेलेल्या नेहाचा मृतदेह बेलापूर खाडीत सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आढळला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. नेहा दामाचे नातेवाईक आणि खारघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक मच्छिमारांना मृतदेह खाडीकिनारी दिसला. वाहून गेलेल्या चार मृतदेहांपैकी तीन मृतदेह खारघरमध्येच घटनास्थळी शनिवारी सापडले होते.
खारघरमधील गोल्फ कोर्सजवळील धबधब्याच्या ओढ्यातून शनिवारी सकाळी वाहून गेलेल्या चार विद्यार्थिनींपैकी तिघींचे मृतदेह सापडले होते. मात्र चौथी विद्यार्थिनी नेहा दामाचा मृतदेह शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोधपथकाच्या हाती न लागल्याने अखेर मोहीम थांबविण्यात आली होती. रविवारी सकाळी खारघर पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केली; मात्र रात्री उशिरापर्यंत मृतदेह हाती लागला नाही.
मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नेहाच्या पालकांसह नातेवाईकांनी खारघर गोल्फ कोर्स परिसरात गर्दी केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत होते. मृतदेह अडकण्यासाठी गोल्फ कोर्स येथील ओढ्यात खारघर पोलिसांनी जाळी बांधली होती. मृतदेह शोधण्यासाठी खारघर पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचीही मदत घेतली होती. मात्र, आज दुपारी १ वाजताच्या सुमारास मच्छीमारांना बेलापूर खाडीकिनारी एक मृतदेह दिसला आणि पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला आहे.
पनवेल - खारघरमधून वाहून गेलेल्या नेहा दमाचा मृतदेह बेलापूर खाडीत सापडला https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) August 5, 2019