BJPचा झेंडा असलेल्या SUVमध्ये सापडला मृतदेह, पत्नीसह मुलीने मिळून केली हिस्ट्रीशीटरची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 16:24 IST2022-04-22T16:23:26+5:302022-04-22T16:24:32+5:30
Murder Case : आरोपींनी मृतदेह भारतीय जनता पक्षाचा (भाजप) झेंडा असलेल्या एसयूव्ही कारमध्ये जैदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकून फरार झाले.

BJPचा झेंडा असलेल्या SUVमध्ये सापडला मृतदेह, पत्नीसह मुलीने मिळून केली हिस्ट्रीशीटरची केली हत्या
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिस्ट्री शीटर जगतपाल याच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे. या हत्याकांडात मृताची पत्नी पिंकी हिने तिची मुलगी आणि साथीदारांसह पतीचा खून केला. आरोपींनी मृतदेह भारतीय जनता पक्षाचा (भाजप) झेंडा असलेल्या एसयूव्ही कारमध्ये जैदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकून फरार झाले.
जगतपाल हत्येप्रकरणी मृताची पत्नी पिंकी हिच्यासह तीन आरोपींना जैदपूर पोलिसांनीअटक केली असून तिच्या मुलीला विधी संघर्ष बालक म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे पोलीस चौकशीत मयत जगतपाल पोलीस स्टेशन बक्षी हद्दीतील हिस्ट्रीशीटर असल्याचे उघड झाले.
मृत जगतपाल हा पत्नी आणि मुलीचा खूप छळ करत असे, त्यामुळे पत्नी आणि मुलीने त्याला मारण्याचा कट रचला. कटाची अंमलबजावणी करण्यासाठी मुलीने तिचा मित्र शिवमला तयार केले. 19 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुलीने शिवमला सोशल मीडिया चॅटद्वारे जगतपाल याला जेवणात झोपेचे औषध दिल्याचे सांगितले.
शिवम त्याचा मित्र कुणालसोबत जगतपालच्या घरी गेला. तेथे शिवम आणि कुणालसह जगतपालची पत्नी आणि मुलीने सोफ्यावरच विटा, पेपर कटर आणि स्क्रू ड्रायव्हरने जगतपालची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर शिवम आणि कुणाल हे जगतपालचा मृतदेह त्यांच्या सफारी गाडीतून विल्हेवाटीसाठी घेऊन जात होते.