झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळला १२ वर्षांच्या मुलीचा मृतदेह; बलात्कार झाल्याचा वडिलांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 16:33 IST2021-05-14T16:30:51+5:302021-05-14T16:33:25+5:30
Murder And Rape Case : घटनेची माहिती मिळताच भीमा आर्मीचे सदस्य पीडितेच्या गावी पोहोचले आणि पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली.

झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळला १२ वर्षांच्या मुलीचा मृतदेह; बलात्कार झाल्याचा वडिलांचा आरोप
अमेठी - अमेठी येथील जामो पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाची हत्या करून बलात्कार केल्याची घटना घडली. मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. घटनेची माहिती मिळताच भीमा आर्मीचे सदस्य पीडितेच्या गावी पोहोचले आणि पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली.
जामो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड्यातील रहिवासी सांगतात की, पीडित 12 वर्षाची मुलगी गुरुवारी संध्याकाळी बकरी चरायला गेली होती. ती घरी परत आली नाही तेव्हा कळले की, तिचा मृतदेह सीगो तालाजवळ एका झाडाला लटकलेला आहे.
वडिलांचा आरोप - कुणीतरी मुलीची हत्या करुन मृतदेह लटकवला
माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आणि तपास सुरू केला. जामो पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अंगद सिंह म्हणाले की, तपासणीनंतरच घटनेची कारणे शोधू शकू. अल्पवयीन पीडितेच्या वडिलांचा आरोप आहे की, "कुणीतरी मुलीची हत्या केली आणि नंतर तिला फासावर लटकवले , तिच्या शरीरावर जखमा आहेत आणि गुप्तांगातून रक्तस्त्राव होत आहे". मृत मुलीचे वडील म्हणाले की, "कोणीतरी तिच्या मृतदेहाला फासावर लटकवले. कारण झाड सरळ आहे आणि तिथे त्या झाडाला फांद्या नाही आहेत. ज्यावर ती बसून स्वतःला लटकवायला झाडावर चढू शकेल."
घातपात की अपघात! दौंडमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह https://t.co/vjTxWEFg7H
— Lokmat (@MiLOKMAT) May 13, 2021
भीम आर्मीच्या नेत्यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे
वडिलांनी असेही म्हणाले होते की, "आमचे कोणाशीही वैर नव्हते, आम्हाला अशी शंका येते की, मुलीसोबत काही वाईट कृत्य केले गेले आहे आणि तिला ठार मारले गेले आणि फासावर लटकवण्यात आले." घटनेची माहिती मिळताच भीम आर्मीचे नेते आनंदसिंग व इतर पीडित मुलीच्या गावी पोहोचले. त्यांनी जामो पोलिस स्टेशन गाठले आणि स्थानिक पोलिसांना या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली.