The bodies of three members of the same family were found, police's primery doubt that father killed 2 daughter then hand himself | एकाच कुटुंबातील तिघांचे आढळले मृतदेह, २ लेकींची हत्या करून पित्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज 

एकाच कुटुंबातील तिघांचे आढळले मृतदेह, २ लेकींची हत्या करून पित्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज 

ठळक मुद्दे ४५ वर्षीय अजगर अली जब्बार अली नावाच्या वडिलांनी दोन मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरातील खान गल्लीत आज एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आले. ४५ वर्षीय अजगर अली जब्बार अली नावाच्या वडिलांनी दोन मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली आहे. 

 

१२ वर्षीय कैनन आणि ९ वर्षीय सुजैन अशी या दोन मुलींची नावे असल्याचे समजते आहे. वडील लोहार काम करायचे. घरी आल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आहे.  मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांना एकूण ४ मुली आहेत. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा अजगर अली जब्बार अली यांनी दोरीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास लावून घेतला होता. तसेच एक मुलगी जमिनीवर तर दुसरी मुलगी ही खुर्चीवर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले आहेत. घटनास्थळी कांदिवली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार हजर असून अधिक तपास चालू आहे.

Web Title: The bodies of three members of the same family were found, police's primery doubt that father killed 2 daughter then hand himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.