पुलावर लटकलेला सापडला मृतदेह; जीन्स घालण्यावरून १७ वर्षीय मुलीची आजोबा, काकाने केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 10:04 PM2021-07-28T22:04:33+5:302021-07-28T22:06:03+5:30

Murder Case : नेहाने दिलेलं उलट उत्तरामुळे तिच्या आजी-आजोबांना आणि काका-काकूंचा राग अनावर झाला.

Bodies found hanging on the bridge; A 17-year-old girl was killed by her grandfather and uncle for wearing jeans | पुलावर लटकलेला सापडला मृतदेह; जीन्स घालण्यावरून १७ वर्षीय मुलीची आजोबा, काकाने केली हत्या

पुलावर लटकलेला सापडला मृतदेह; जीन्स घालण्यावरून १७ वर्षीय मुलीची आजोबा, काकाने केली हत्या

Next
ठळक मुद्देसंध्याकाळी आंघोळ केल्यानंतर तिने जीन्स-टॉप घालून पूजा केली. पूजेच्या वेळी सगळं शांत होत. पूजा झाल्यानंतर तिचे आजोबा आणि काका काकू तिच्या अंगावर धावून गेले या सहा जणांनी जीन्स का घातलीस? असं म्हणत तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील महुआडीह भागात १७ वर्षांच्या मुलीचा खून करण्यात आला होता. तिचा मृतदेह तिच्या घरापासून 20 किलोमीटर अंतरावर एका पुलाजवळ लटकलेला सापडला होता. नेहा पासवान असं या मुलीचं नाव असून तिचे वडील अमरनाथ हे मोलमजुरीचे काम करतात. कामानिमित्त ते लुधियानाला गेले होते. त्यांना जेव्हा मुलीची हत्या झाल्याचं कळालं तेव्हा ते आपल्या घरी पोहोचले होते.


पोलिसानी या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर नेहाच्या आईची चौकशी केली. आईने सांगितले की, ही घटना 20 जुलैला घातली. त्यादिवशी नेहाचा उपवास होता. सकाळी उठून तिने पूजा-अर्चा केली. संध्याकाळी आंघोळ केल्यानंतर तिने जीन्स-टॉप घालून पूजा केली. पूजेच्या वेळी सगळं शांत होत. पूजा झाल्यानंतर तिचे आजोबा आणि काका काकू तिच्या अंगावर धावून गेले या सहा जणांनी जीन्स का घातलीस? असं म्हणत तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली. नेहाने त्यांना प्रतिउत्तर देत जीन्स सरकारने परिधान करण्यासाठी बनवली आहे असे म्हटलं. यामुळे मला ती घालायची आहे मला शिकायच असून समाजात वावरायचं आहे" असे उलट उत्तर दिले. 

 

नेहाने दिलेलं उलट उत्तरामुळे तिच्या आजी-आजोबांना आणि काका-काकूंचा राग अनावर झाला. त्यांनी नेहाला मारहाण करायला सुरुवात केली. तुला जीन्स घालू देणार नाही आणि शिकूही देणार नाही असं म्हणत त्यांनी नेहाला बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे नेहाचा जीव गेला. नेहाची आई शकुंतला देवी हिने पोलिसांना सांगितलं की, नेहाच्या आजी-आजोबा आणि काका-काकूनी सांगितलं तुझी मुलगी बेशुद्ध पडली असून आम्ही तिला रुग्णालयात नेतो. ज्या पद्धतीने तिला रिक्षात घालण्यात आल त्यावरून आपल्या मुलीचा मृत्यू झाला असावा असा  शकुंतला देवीला संशय आला . तिने 'मुलीसोबत मी ही येते' असं अनेकदा विनवणी केली मात्र तिला या सहा जणांनी सोबत नेलं नाही.

शकुंतला देवी हिने तिच्या नातेवाईकांना या प्रकाराबाबत सांगितलं असता त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि नेहाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना इथे कोणतीही अशा नावाची मुलगी आली नसल्याचं सांगण्यात आलं. यानंतर शकुंतला देवी आणि इतरांनी नेहाचा शोध घ्यायला सुरुवात केली. शोधाशोध करत असताना नेहाचा मृतदेह गंडक नदीवरील पुलाजवळ लटकलेला सापडला. आरोपींनी नेहाचा मृतदेह नदीत फेकून देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिचा पाय गटारावरील जाळीत अडकला होता. त्यामुळे तो मृतदेह लटकत राहिला. पोलिसांनी या प्रकरणी नेहाचे आजोबा परमहंस, आजी भगना देवी, काका व्यास, काकू गुड्डी देवी, दुसरा काका अरविंद दुसरी काकू पूजा देवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अरविंद पासवानचा मित्र राजू यादव आणि रिक्षाचालक हसनैन यांच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Bodies found hanging on the bridge; A 17-year-old girl was killed by her grandfather and uncle for wearing jeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app