आधी मुसेवालाची रेकी, मग दिशा पाटनीच्या घरावर हल्ला; ७ वर्षांपासून फरार कुख्यात गँगस्टर बॉबी कबूतर अटकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 16:14 IST2026-02-18T16:14:18+5:302026-02-18T16:14:58+5:30

अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबारासाठी शस्त्र पुरवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Bobby Kabutar arrested Weapons were supplied for firing at actress Disha Patani house | आधी मुसेवालाची रेकी, मग दिशा पाटनीच्या घरावर हल्ला; ७ वर्षांपासून फरार कुख्यात गँगस्टर बॉबी कबूतर अटकेत!

आधी मुसेवालाची रेकी, मग दिशा पाटनीच्या घरावर हल्ला; ७ वर्षांपासून फरार कुख्यात गँगस्टर बॉबी कबूतर अटकेत!

Disha Patani House Firing: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एक मोठी कारवाई करत गेल्या ७ वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात गँगस्टर महफूज उर्फ बॉबी कबूतर याला बेड्या ठोकल्या आहेत. बॉबी कबूतर हा लॉरेन्स बिश्नोई आणि हाशिम बाबा टोळीचा अत्यंत विश्वासू मानला जातो. त्याच्या अटकेमुळे अनेक हाय-प्रोफाइल गुन्ह्यांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मूसेवालाच्या हत्येपूर्वी केली होती 'रेकी'

तपासात समोर आलेले खुलासे अत्यंत धक्कादायक आहेत. २९ मे २०२२ रोजी झालेल्या प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येपूर्वी बॉबी कबूतरने त्यांच्या हालचालींची आणि मार्गाची रेकी केली होती. त्याने गोळा केलेली माहितीच गोल्डी बराड आणि लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरपर्यंत पोहोचवण्यात आली होती, ज्याचा वापर करून मूसेवाला यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली.

अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावरील गोळीबारात सहभाग

बॉबी कबूतरचा संबंध केवळ पंजाबशी नसून उत्तर प्रदेशातही त्याचे जाळे पसरले आहे. गेल्या वर्षी बरेली येथील सिव्हिल लाइन्स भागात बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या निवासस्थानी दोन दुचाकीस्वारांनी १०-१५ राऊंड गोळीबार केला होता. या गोळीबारासाठी वापरलेली अत्याधुनिक परदेशी शस्त्रे बॉबी कबूतरनेच शूटर्सना उपलब्ध करून दिली होती. या हल्ल्यात दिशा पाटनी यांचे वडील, आई आणि बहीण थोडक्यात बचावले होते. या प्रकरणातील दोन शूटर्सचा यापूर्वीच एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला आहे.

गँगस्टर हाशिम बाबाचा उजवा हात

बॉबी कबूतर हा दिल्लीतील कुख्यात गँगस्टर हाशिम बाबा जो सध्या तिहार जेलमध्ये आहे याच्यासाठी काम करतो. तो दिल्लीतील सीलमपूर येथील दुहेरी हत्याकांड आणि ग्रेटर कैलाशमधील नादिर शाह हत्या प्रकरणातही आरोपी आहे. गेल्या ७ वर्षांपासून तो आपली ओळख लपवून पोलिसांना चकवा देत होता, मात्र टेक्निकल सर्व्हिलन्सच्या मदतीने स्पेशल सेलने त्याला जेरबंद केले.

दरम्यान, दिशा पाटनी यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर हल्लेखोरांनी सोशल मीडियावर या कृत्याची जबाबदारी स्वीकारली होती. प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांचा अपमान केल्याचा दावा करत त्यांनी हा हल्ला केल्याचे सांगितले होते. मात्र, पोलीस आता यामागील खरा मास्टरमाइंड आणि खंडणीचा अँगल तपासत आहेत.

Web Title : गैंगस्टर बॉबी कबूतर गिरफ्तार: मूसे वाला रेकी, दिशा पाटनी के घर पर हमला।

Web Summary : कुख्यात गैंगस्टर बॉबी कबूतर, जो मूसे वाला की हत्या और दिशा पाटनी के घर पर हमले से जुड़ा है, 7 साल बाद गिरफ्तार। उसने पाटनी के परिवार पर हमले के लिए हथियार दिए और मूसे वाला के हत्यारों के लिए रेकी की।

Web Title : Gangster Bobby Kabutar Arrested: Moose Wala recce, Disha Patani house attack.

Web Summary : Notorious gangster Bobby Kabutar, linked to Moose Wala's murder and the attack on Disha Patani's house, has been arrested after 7 years on the run. He supplied weapons for the attack on Patani's family and did recce for Moose Wala's killers.