पालिकेच्या लाचखोर मुकादमाला एसीबीने केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 19:14 IST2019-04-15T19:14:09+5:302019-04-15T19:14:45+5:30

आज एसीबीने ही कारवाई केली आहे. 

Bmc's bribery mukadam has been arrested by ACB | पालिकेच्या लाचखोर मुकादमाला एसीबीने केली अटक 

पालिकेच्या लाचखोर मुकादमाला एसीबीने केली अटक 

ठळक मुद्दे११ एप्रिलला फिर्यादी यांनी मुकादमी जाधवला फोन केला असता प्रत्यक्ष भेटून पैशाचे काय ते ठरवू असे सांगितले.जाधव याने फिर्यादीकडे १५ हजार इतकी रक्कम  लाच म्हणून मागितली होती.सापळा रचून विनोद जाधव यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. 

मुंबई - बृहन्मुंबई महापालिकेच्या गोवंडी येथील एम पूर्व प्रभागातील मुकादम विनोद जाधव (३९) याला १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) अटक केली आहे. आज एसीबीने ही कारवाई केली आहे. 

फिर्यादी यांच्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरु होते असून २७ मार्च रोजी पालिकेचा मुकादम विनोद जाधवने त्यांच्या घरी भेट देऊन तुला माहित नाही का? तुला बांधकाम करायचे असेल तर पैसे द्यावे लागतील नाहीतर कारवाई कारेन असे सांगून फोन करून भेटायला सांगितले. त्यानंतर ११ एप्रिलला फिर्यादी यांनी मुकादमी जाधवला फोन केला असता प्रत्यक्ष भेटून पैशाचे काय ते ठरवू असे सांगितले. मात्र, फिर्यादी याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे याबाबत तक्रार केली होती. जाधव याने फिर्यादीकडे १५ हजार इतकी रक्कम  लाच म्हणून मागितली होती. त्यांनतर तडजोडीअंती १० हजार लाचेची रक्कम ठरविण्यात आली होती. त्यानंतर एसीबीने सापळा रचून विनोद जाधव यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. 

 

Web Title: Bmc's bribery mukadam has been arrested by ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.