पती बेपत्ता म्हणून अंध महिलेने केला फोन, पोलिसांनी येऊन बेडवर पाहिला पडलेला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 19:31 IST2022-01-02T19:30:14+5:302022-01-02T19:31:11+5:30
Crime News : आता पोलीस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, तिच्या पतीला इतक्या वेळा गोळ्या लागल्या पण पत्नीला एकाही गोळीचा आवाज कसा ऐकू आला नाही. आता पोलीस या प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत.

पती बेपत्ता म्हणून अंध महिलेने केला फोन, पोलिसांनी येऊन बेडवर पाहिला पडलेला मृतदेह
यूके पोलीस एका प्रकरणाचा तपास करत आहेत ज्यात एका 76 वर्षीय अंध महिलेने पोलिसांना कॉल करून तिचा नवरा बेपत्ता आहे सांगितले. मात्र, पोलीस जेव्हा तिच्या घरी पोहोचले तेव्हा तिचा नवरा बेडवर मृतावस्थेत पडला आहे.
पत्नीने पोलिसांना सांगितले विचित्र गोष्ट
डेली स्टारच्या वृत्तानुसार, विल्यम रॉबर्ट लँग जूनियरच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, मंगळवारी दुपारपासून तिचा पती बोलत नाहीये. हा प्रकार विचित्र असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. आजच्या आधी असे कधीच घडले नव्हते.
अंध महिलेचा नवरा बेडवर मृतावस्थेत पडला होता
ही माहिती मिळताच बुधवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर पोलिस जेव्हा दाम्पत्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला. तिचा नवरा पलंगावर मृतावस्थेत पडला होता, ज्याला अनेक गोळ्या लागल्या होत्या.
यामुळे पोलिसही हैराण झाले आहेत
आता पोलीस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, तिच्या पतीला इतक्या वेळा गोळ्या लागल्या पण पत्नीला एकाही गोळीचा आवाज कसा ऐकू आला नाही. आता पोलीस या प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत.
पोलिस सर्व पुरावे तपासत आहेत
आता पोलीस अंध महिलेच्या पतीची हत्या का आणि कोणी केली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस या प्रकरणातील सर्व पुराव्यांची छाननी करत आहेत आणि त्याला खुन्यापर्यंत नेतील अशा प्रत्येक तपशीलावर काम करत आहेत.