लग्नाच्या एका दिवसानंतरच पत्नीवर केले ब्लेडने वार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 07:11 IST2021-03-17T07:10:56+5:302021-03-17T07:11:45+5:30

सकाळी बाहेर फिरायला जाऊ, असे तो पत्नीला म्हणाला. त्यावर नवीन लग्न असल्यामुळे बाहेर फिरायला जाता येत नाही, असे पत्नीने सांगितले. त्याचा राग येऊन त्याने पत्नीचे पाठीमागून तोंड दाबले व तिच्या गळ्यावर दोन वेळा ब्लेडने वार करून जखमी केले.

The blade struck his wife just a day after the wedding | लग्नाच्या एका दिवसानंतरच पत्नीवर केले ब्लेडने वार 

लग्नाच्या एका दिवसानंतरच पत्नीवर केले ब्लेडने वार 

सिंदेवाही (चंद्रपूर) :  लग्नाला केवळ एक दिवस झाला असताना क्षुल्लक कारणावरून पतीने ब्लेडने वार करून पत्नीला जखमी केले. ही घटना मंगळवारी लोनवाही येथे घडली. प्रमोद माधव आत्राम (२८ रा. पळसगाव पिपर्डा) असे आरोपी नवऱ्याचे नाव आहे. 

सकाळी बाहेर फिरायला जाऊ, असे तो पत्नीला म्हणाला. त्यावर नवीन लग्न असल्यामुळे बाहेर फिरायला जाता येत नाही, असे पत्नीने सांगितले. त्याचा राग येऊन त्याने पत्नीचे पाठीमागून तोंड दाबले व तिच्या गळ्यावर दोन वेळा ब्लेडने वार करून जखमी केले. आरोपी प्रमोदला अटक करण्याची कारवाई सुरू होती.
 

Web Title: The blade struck his wife just a day after the wedding