शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

खळबळजनक! भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींपैकी 2 जण TMC चे कार्यकर्ते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 10:39 IST

BJP worker wife brutally gangraped by tmc workers : भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी दोन तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एक भयंकर घटना समोर आली आहे. भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी दोन जण तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. ही महिला स्थानिक भाजपा कार्यकर्त्याची पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय महिलेवर तिच्याच घरात सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून राजकारण तापलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आपल्या घरी एकटी असताना आरोपी घरात शिरले आणि महिलेचे हात, पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. महिला आजारी असल्यामुळे महिलेला बोलताना त्रास होत असल्या कारणाने ती मदतीसाठी आवाज देऊ शकली नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे. यावेळी महिलेचा पती कामानिमित्त घराबाहेर होता. सहा आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शेख सय्यद आणि जोयनाल मुल्लिक अशी त्यांनी नावं आहेत. दरम्यान आरोपींमध्ये तृणमूलचे ब्लॉक अध्यक्ष कुतुबुद्दीन आणि स्थानिक कार्यकर्त्याचा समावेश आहेत. 

"TMC विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बलात्काराचा राजकीय साधन म्हणून वापर करतंय" 

महिलेला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपाचे आयटी सेल प्रमुख अमित मालविया यांनी याप्रकरणी गंभीर आरोप केला आहे. "पोलिसांनी सुरुवातीला महिलेची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. प्रकरण दडपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. टीएमसी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बलात्काराचा राजकीय साधन म्हणून वापर करत आहे" असं म्हटलं आहे. तसेच टीएमसी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बलात्कारासारख्या गुन्ह्यांना पाठबळ देत असल्याचा आरोप देखील भाजपाने केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

संतापजनक! हुंड्यामध्ये कार आणि 5 लाख न दिल्याने सासरचे झाले हैवान; विवाहितेवर 12 जणांकडून बलात्कार

 देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. हुंड्यामध्ये एसयूव्ही कार आणि 5 लाख रुपये दिले नाहीत म्हणून सासरची मंडळी हैवान झाली. विवाहितेवर कुटुंबातील 12 जणांकडून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही भयंकर घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणीने हुंडा दिला नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांविरोधात सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. यासंदर्भात महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपाPoliceपोलिसTrinamool Congressतृणमूल काँग्रेसIndiaभारतwest bengalपश्चिम बंगाल