भाजपाचा प्रदेश सचिवाची गोळ्या झाडून हत्या; भावाची प्रकृती चिंताजनक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 21:56 IST2018-11-01T21:55:45+5:302018-11-01T21:56:20+5:30

जम्मू-कश्मीर -  किश्तवाड़ परिसरात  भाजपाचे प्रदेश सचिव अनिल परिहार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात ...

BJP secretaries shot dead; Brother's condition worrisome | भाजपाचा प्रदेश सचिवाची गोळ्या झाडून हत्या; भावाची प्रकृती चिंताजनक 

भाजपाचा प्रदेश सचिवाची गोळ्या झाडून हत्या; भावाची प्रकृती चिंताजनक 

जम्मू-कश्मीर -  किश्तवाड़ परिसरात भाजपाचे प्रदेश सचिव अनिल परिहार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार एक अज्ञात हल्लेखोर अनिल परिहार यांच्यावर गोळ्या झाडून फरार झाला. त्यावेळी अनिल परिहार यांचा भाऊ अजित परिहार देखील त्यांच्यासोबत असल्याने अजित यांना सुद्धा गोळी छाटून गेली. या हल्ल्यात अजित परिहार देखील गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजित परिहार यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी याप्रकरणी तपासकार्य सुरु केले आहे. 

Web Title: BJP secretaries shot dead; Brother's condition worrisome