भाजपा खासदार राकेश सिन्हा यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीने दारूच्या नशेत केला मेसेज
By पूनम अपराज | Updated: January 31, 2021 17:32 IST2021-01-31T17:31:53+5:302021-01-31T17:32:45+5:30
BJP MP Rakesh Sinha threatened to kill : या तक्रारीत त्यांनी एक व्यक्ती वारंवार मेसेज करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं म्हटलं आहे.

भाजपा खासदार राकेश सिन्हा यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीने दारूच्या नशेत केला मेसेज
भाजपाचे राज्यसभेचे खासदार राकेश सिन्हा यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनीअटक केली आहे. राकेश यांनी दिल्लीपोलिसांना याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी एक व्यक्ती वारंवार मेसेज करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं म्हटलं आहे.
पोलिसांनी तांत्रिक दृष्ट्या तपास करून एका ३९ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी राजस्थान येथील झुंझुनू गावचा राहणारा आहे. सध्या तो दिल्लीतील मायापुरी परिसरात राहत आहे. चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याला राकेश सिन्हा यांचा ट्विटर अकाऊंटवरून मोबाईल नंबर मिळाला आणि दारूच्या नशेत त्याने धमकीचा मेसेज केला.
गोळीबार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ८ गुन्हेगार जेरबंद; कोंढव्यातील घटना
नोकरीच्या बहाण्याने महिलाच ४० हजारांत करत होती मुलींचा सौदा
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आरोपीला अटक केली असून खासदार राकेश सिन्हा यांच्या तक्रारीवरून त्याला अटक करण्यात आली आहे. टेक्निकल सर्व्हिलन्सच्या माध्यमातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी राजस्थानच्या झुंझुनूचा राहणारा आहे.