शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Manoj Tiwari : भाजपा खासदार मनोज तिवारींच्या घरात लाखोंची चोरी; जुन्या कर्मचाऱ्यानेच केला विश्वासघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 11:12 IST

Manoj Tiwari : भाजपा खासदार आणि प्रसिद्ध गायक मनोज तिवारी यांच्या मुंबईतील निवासस्थानी ५.४० लाख रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

भाजपा खासदार आणि प्रसिद्ध गायक मनोज तिवारी यांच्या मुंबईतील निवासस्थानी ५.४० लाख रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंधेरी पश्चिम येथील शास्त्रीनगर परिसरातील 'सुंदरबन अपार्टमेंट'मध्ये ही चोरी झाली असून, त्यांच्याच एका जुन्या कर्मचाऱ्याने ही चोरी केल्याचं समोर आलं आहे. 

याप्रकरणी मनोज तिवारी यांचे मॅनेजर प्रमोद जोगेंदर पांडेय यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सुरेंद्रकुमार दीनानाथ शर्मा याला अटक केली आहे. आरोपी सुरेंद्रकुमार याला सुमारे दोन वर्षांपूर्वी नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं.

अशी झाली चोरी 

आंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रमोद पांडेय हे गेल्या २० वर्षांपासून मनोज तिवारी यांचे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पोलिसांना सांगितलं की, बेडरुममध्ये ठेवलेली एकूण ५.४० लाख रुपयांची रोकड चोरीला गेली होती. यापैकी जून २०२५ मध्ये कपाटात ठेवलेले ४.४० लाख रुपये आधीच गायब झाले होते, मात्र त्यावेळी चोरट्याचा सुगावा लागला नव्हता.

बनावट चाव्यांचा वापर

चोरीचा छडा लावण्यासाठी डिसेंबर २०२५ मध्ये घराच्या आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. १५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सीसीटीव्ही अलर्टद्वारे माजी कर्मचारी सुरेंद्रकुमार शर्मा हा चोरी करताना दिसून आला. सीसीटीव्ही फुटेजमधून असं स्पष्ट झालं की, आरोपीकडे घराच्या मुख्य दरवाजाच्या, बेडरुमच्या आणि कपाटाच्या बनावटी चाव्या होत्या. त्यांच्या मदतीने तो अगदी सहज घरात प्रवेश करत असे.

गुन्ह्याची कबुली आणि अटक 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच रात्री (१५ जानेवारी) सुमारे एक लाख रुपयांची चोरी केली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला. त्यानंतर आंबोली पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीThiefचोरMONEYपैसाMumbaiमुंबईPoliceपोलिस