शहरं
Join us  
Trending Stories
1
किती आमदार संपर्कात?; जयंत पाटलांच्या एका वाक्याने वाढवली अजित पवारांच्या पक्षाची धाकधूक!
2
काँग्रेसच्या खासदारांचं शतक पूर्ण.! ठाकरेंची मशाल पाडून विशाल काँग्रेसमध्ये दाखल
3
"...तर आपण सर्वांनी उपोषणाला बसायचे आहे, मी स्वतः उपोषणाला बसणार"; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
4
विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजितदादांविरोधात युगेंद्र पवार मैदानात? आव्हाडांचे सूचक भाष्य
5
शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा, लोकांचे ३० लाख कोटी बुडाले; राहुल गांधींचा मोदी-शाह यांच्यावर गंभीर आरोप
6
TDP आणि BJP मध्ये झालं एकमत; सरकारमध्ये सहभागी होण्याचा 'असा' ठरला फॉर्म्युला?
7
नितीश कुमारांच्या अनावश्यक मागण्या मान्य करणार नाही; भाजपने स्पष्टच सांगितले...
8
2019 मध्ये जे घडले त्याचे सूत्रधार देखील एकनाथ शिंदे; काळेंशी गळाभेटीनंतर अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट 
9
उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली
11
भाजपा खासदार नारायण राणेंनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट
12
400 पारचा नारा खोटा होता, माझे स्वतःचे कार्यकर्ते नसते तर हारलो असतो! भाजप खासदाराचा घरचा आहेर
13
वयाच्या २५ व्या वर्षी बनल्या खासदार; कोण आहेत हे युवा चेहरे, जे संसदेत पोहचले?
14
“आमचा ८० टक्के स्ट्राइक रेट, विधानसभेला १८० जागा निवडून येतील”; जयंत पाटील यांचा दावा
15
लाचखोरीचं गुजरात मॉडेल, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाच देण्यासाठी दिली EMI सुविधा 
16
आशिष शेलारांचा यु-टर्न, आधी म्हणाले राजकारण सोडणार, आता म्हणाले, "आधी उद्धव ठाकरेंनी राजकीय ..."
17
राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? अखिलेश यादव म्हणाले, "पुण्याचे काम करताना जर..."
18
नितीश कुमारांनी मागितली 'ही' ३ महत्त्वाची खाती; भाजपाची वाढणार डोकेदुखी?
19
सुप्रिया सुळेंविरोधात नामदेवराव जाधवांना, अन् बिचुकलेंना कल्याण, साताऱ्यात किती मते मिळाली? आकडा पाहून काय म्हणाल
20
लग्न कधी करणार? ऋषी सक्सेनाने घेतलं ईशाचं नाव; म्हणाला, "मी तयारच आहे पण...

भाजप आमदार राजा सिंह पोलिसांच्या ताब्यात, 'ते' वादग्रस्त वक्तव्य भोवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 10:35 AM

मिळालेल्या माहितीनुसार राजा सिंह यांच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत

हैदराबाद - भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्यानंतर आता तेलंगाणामधील भाजपाआमदार टी राजा सिंह यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यानंतर, हैदराबादेत त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली असून मुस्लीम नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. राजा सिंह यांच्या अटकेची मागणी या लोकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे, अखेर तेंलगणातील हैदराबाद पोलिसांनी राजा सिंह यांना ताब्यात घेतलं. त्यांना गाडीत घालून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार राजा सिंह यांच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. एवढंच नाही तर दबीरपुरा, भवानीनगर, रेनबाजार, मिरचौक पोलीस ठाण्यांमध्ये राजा सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच संसप्त लोकांनी राजा सिंह यांच्याविरोधात आंदोलनही केले.आमदार राजा सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांनी सांगितले की, राजासिंह एका समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आमदाराविरुद्ध तीव्र आक्रोश व्यक्त केला जात आहे. तसेच त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे. सोमवारी रात्री पोलीस कमिश्नन सी.व्ही. आनंद यांचे कार्यालय आणि शहराच्या इतर भागांमध्ये आंदोलन सुरू झाले. या व्हिडीओमध्ये राजा सिंह हे कॉमेडियन मुनव्वर फारुखी आणि त्याच्या आईबाबतही टिप्पणी करताना दिसत आहेत. त्यामुळे संतप्त लोकांनी आंदोलन करत त्यांच्या अटकेची मागणी केली.

दरम्यान, टी. राजा सिंह हे हैदराबादमधील गोशामहल मतदारसंघातील आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांनाही धमकी दिली होती. सिंह यांनी हल्लीच एक व्हिडीओ अपलोड केला होता. त्यामध्ये त्यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान केले होते.  

टॅग्स :MLAआमदारBJPभाजपाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीhyderabad caseहैदराबाद प्रकरण