शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 14:51 IST

सोनाली फोगाट यांना हिसार मार्केट किमिटीचे सेक्रेटरी सुल्तानसिंह यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर जामिनावर मुक्तता करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

ठळक मुद्देभाजपा नेत्या आणि टीकटॉक स्टार सोनाली फोगाट यांनी हिसार मार्केट किमिटीचे सेक्रेटरी सुल्तानसिंह यांना चारचौघात चप्पलेनं मारहाण केली होती.सोनाली फोगाट या टीकटॉक स्टार असून टीकटॉकवर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

हिसार - भाजपा नेत्या आणि टीकटॉक स्टार सोनाली फोगाट यांनी हिसार मार्केट किमिटीचे सेक्रेटरी सुल्तानसिंह यांना चारचौघात चप्पलेनं मारहाण केली होती. सोशल मीडियावर सोनाली यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सोनाली यांनी चप्पलेसह त्यांना थप्पडही लगावली होती. असभ्य भाषेचा वापर केल्यामुळे फोगाट यांनी कमिटीच्या सेक्रेटरीवर हल्लाबोल केला. तेथील उपस्थितांनीच हा व्हिडिओ शूट करून व्हायरल केला होता. सोनाली फोगाट यांना हिसार मार्केट किमिटीचे सेक्रेटरी सुल्तानसिंह यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनीअटक केली. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर जामिनावर मुक्तता करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  हरियाणातील हिसार येथील मार्केट कमिटीमध्ये सोनाली फोगाट पोहोचल्या होत्या. त्यावेळी, काही कारणावरुन मार्केट कमिटीच्या सेक्रेटरीसोबत त्यांचा वाद झाला होता. नंतर हे भांडण वाढल्याने, सोनाली यांनी थेट सेक्रेटरी सुल्तानसिंह यांना कानशिलात लगावली होता. त्यानंतर, आपल्या पायातील चप्पल काढून त्यांना मारहाण केली. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला असून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या व्हिडिओत सोनाल यांचा आवाज ऐकायला येत आहे. 'आप किस तरह से ऐसी बात कर सकते है'... असं त्या व्हिडिओत म्हणत आहेत.मार्केट कमिटीच्या सेक्रेटरीने त्यांच्याशी गैरवर्तन केले, असा आरोप सोनाली यांनी केला. त्यामुळे, संताप अनावर झाल्याने सोनाली यांनी चप्पलेने सेक्रेटरीला मारहाण केली. हरियाणातील गेल्या विधानसभा निवडणुकीत सोनाली फोगाट यांनी आदमपूर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री भजनलालचे सुपुत्र कुलदीप बिश्नोई यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. सोनाली फोगाट या टीकटॉक स्टार असून टीकटॉकवर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

 

बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध

 

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर देशभरात चर्चा, SCनंही मानसिक आजाराबाबत केला सवाल

 

टॅग्स :ArrestअटकBJPभाजपाPoliceपोलिसTik Tok Appटिक-टॉक