शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
2
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
3
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
4
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
5
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
6
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
7
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
8
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
9
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
10
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
11
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
12
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
13
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
15
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
16
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
17
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
18
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
19
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
20
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."

भयंकर! भाजपा नेत्याच्या आईची आणि दीड वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; पत्नी, मुलगी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 11:05 IST

BJP leader mother and son killed : भाजपा नेत्याच्या आईची आणि दीड वर्षीय चिमुकल्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तसेच आरोपींनी केलेल्या हल्ल्यात पत्नी आणि दहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. एका भाजपा नेत्याच्या आईची आणि दीड वर्षीय चिमुकल्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तसेच आरोपींनी केलेल्या हल्ल्यात पत्नी आणि दहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. परशुराम शुक्ला असं या भाजपा नेत्याचं नाव आहे. त्याच्या कुटुंबातील चारही सदस्यांवर फावड्याने हल्ला करण्यात आला. ज्यावेळी कुटुंबीयांवर हल्ला झाला त्यावेळी शुक्ला घरामध्ये नव्हते. ते कामानिमित्त बाहेर गेले होते. गोरखपूरच्या हरपूर-बुदहट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेनुआ गावात मंगळवारी (27 जुलै) संध्याकाळी सातच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य असलेल्या परशुराम शुक्ला यांच्या घरावर सीताराम शुक्ला यांनी हल्ला केला. त्यावेळी परशुराम हे आपल्या काही कामानिमित्त लुधियाना येथे गेले होते. सीताराम आणि परशुराम यांच्यात छतावरून पाणी गळतं यावरून वाद झाला होता. याबाबत पोर्टलवर तक्रार दाखल करण्यात आली होती. मंगळवारी दुपारी पोलीस आयजीआरएस पोर्टलच्या तक्रारीनुसार तपास आणि अधिक चौकशी करण्यासाठी सीताराम शुक्लाच्या घरी आले होते. सीताराम ऑटो चालवतो. तो संध्याकाळी घरी आल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला याबाबत माहिती दिली. 

सीताराम हे ऐकून खूप संतापला, रागाच्या भरात तो फावडं घेऊन परशुराम शुक्ला यांच्या घरी गेला. त्याने परशुराम यांची 70 वर्षीय आई विमला देवी आणि दीड वर्षांच्या मुलगा रौनक यांच्या डोक्यात आणि मानेवर फावड्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली आहे. आपल्या आईला आणि सासूला वाचवण्यासाठी परशुराम यांची पत्नी सुषमा शुक्ला यांनी धाव घेतली. तेव्हा त्यांच्यावर आणि दहा वर्षीय मुलीवर फावड्याने वार केला. यामध्ये त्या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

घटनेची माहिती मिळताच गोरखपूरचे एसएसपी दिनेश कुमार प्रभ, मनोज अवस्थी, एके सिंह हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. तसेच गावात तणावाचं वातावरण असल्याने पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत. हत्या केल्यानंतर सीताराम शुक्ला फरार झाला आहे. पोलिसांच्या काही टीम त्याचा शोध घेत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBJPभाजपाDeathमृत्यू