शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवक विकी कुकरेजाविरुद्ध ॲट्रॉसिटी, विनयभंगाचाही गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 21:01 IST

Crime News : नागपुरात कार्यालयाची तोडफोड, भाजपा-काँग्रेसमध्ये जोरदार राडा

नागपूर : प्रभागातील समस्याचे निवेदन देण्यासाठी भाजप नगरसेवक विकी ऊर्फ वीरेंद्र कुकरेजा यांच्या जनसंपर्क कार्यालयात गेलेल्या महिला आणि इतरांसोबत झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. कुकरेजा यांच्या कार्यालयात दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली. यावेळी नगरसेवक कुकरेजा यांच्यावर हल्ला करून मारहाण करण्यासोबतच विरोधकांनी त्यांचे कपडेही फाडले. तर, कुकरेजा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिलांशी लज्जास्पद वर्तन करून त्यांना मारहाण करण्यासोबतच त्यांचा विनयभंगही केल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे उत्तर नागपुरात आज दिवसभर तणावाचे वातावरण होते. प्रभागातील काही महिला आणि काँग्रेसचे नेते बाबू खान रविवारी सकाळी १०.३० वाजता नगरसेवक विक्की कुकरेजा यांच्या कार्यालयात गेले. कार्यालयातील कार्यकर्त्यांनी कुकरेजा यांना फोनवरून माहिती देऊन बाजूलाच कार्यक्रमात असलेल्या कुकरेजा यांना बोलवून घेतले. वाघमारे आणि अन्य महिलांनी त्यांना कार्यालयात महिलांसोबत बाबू खान दिसल्याने कुकरेजा भडकले. यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर कुकरेजा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिलांना शिवीगाळ करून कार्यालयातून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी तेथे तोडफोड सुरू केली. ते पाहून विकी कुकरेजा यांनी भाजपा कार्यकर्त्यांना तर बाबू खान यांच्यासोबत असलेल्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना जनसंपर्क कार्यालयात बोलावून घेतले. भाजपा आणि काँग्रेसचेही कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तेथे जोरदार राडा झाला. एकमेकांना मारहाण करतानाच विरोधकांनी कुकरेजा यांना मारहाण करून त्यांचे कपडे फाडले. भाजपा तसेच कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान धुमश्चक्री झाल्याने कुकरेजा आणि त्यांचे काही कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे बाबू खान आणि त्यांचे कार्यकर्ते जखमी झाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस तेथे पोहचले. दोन्ही कडचे नेते कार्यकर्ते आक्रमक मोडवर असल्याचे पाहून अधिकाऱ्यांनी दंगाविरोधी पथकासह पोलिसांचा मोठा ताफा बोलावून घेतला. कॉंग्रेसचे युवा नेते कुणाल राऊत, वेदप्रकाश आर्य आणि माजी नगरसेवक सुरेश जग्यासी तर भाजपाचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके माजी आमदार मिलिंद माने यांच्यासह जरीपटक्यातील अनेक नगरसेवक घटनास्थळी पोहचले. जोरदार घोषणाबाजीमुळे वातावरण चिघळल्याचे लक्षात आल्याने अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त मनिष कलवानीया, पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी सर्वांची समजूत काढत त्यांना पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर तेथे मोठ्या संख्येत भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्ते पोहचले. त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, तक्रारीवरून पोलिसांनी विक्की कुकरेजा आणि त्यांच्या २० ते २५ सहकाऱ्यांविरुद्ध अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रासिटी) कायद्याचे कलम ३ (१) तसेच महिलांचा विनयभंग करून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. कुकरेजा यांच्या गटाच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाबू खान  आणि साथीधारांविरुद्ध खंडणी वसुली, तोडफोड करणे आणि विनयभंग करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.रस्त्यावर जाळपोळ, हुल्लडबाजीया घटनेनंतर काही कार्यकर्त्यांनी जरीपटक्यातील काही भागात धुमाकूळ घालून टायर पेटवले. रस्त्यावर गोंधळ घातला. त्यांच्या हुल्लडबाजीमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. त्यामुळे रस्त्यावर मोठा धूर दिसत असल्याने एकच खळबळ उडाली. दगडफेक तसेच जाळपोळीच्या धाकाने अनेक व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानांची शटर बंद केली.

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाPoliceपोलिसnagpurनागपूरBJPभाजपाcongressकाँग्रेस