भाजपा उमेदवार मनोज कोटक यांचा प्रचाररथाची नासधूस करून चालकास शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 17:22 IST2019-04-16T17:21:07+5:302019-04-16T17:22:40+5:30

याप्रकरणी भाजपाद्वारे शिवाजी नगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली.  

BJP candidate Manoj Kotak's campaign was overthrown by demolishing the driver | भाजपा उमेदवार मनोज कोटक यांचा प्रचाररथाची नासधूस करून चालकास शिवीगाळ

भाजपा उमेदवार मनोज कोटक यांचा प्रचाररथाची नासधूस करून चालकास शिवीगाळ

ठळक मुद्देमनोज कोटक यांच्या प्रचार रॅलीसाठी तयार असलेल्या प्रचार रथाची नासधूस करण्यात आली.याप्रकरणी भाजपाद्वारे शिवाजी नगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने देशभरात वातावरण तापले आहे. राजकीय पक्षांचे एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचार रॅलीसाठी तयार असलेल्या प्रचार रथाची नासधूस करण्यात आली. मानखुर्द परिसरातील प्रचार रथावरील पोस्टरवर लावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो धारदार शस्त्राने फाडून वाहन चालकाला धमकावून शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी भाजपाद्वारे शिवाजी नगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली. 

लोकसभा निवडणुकीसाठी संबंध मुंबईत प्रचाराचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच ईशान्य मुंबईचे भाजपाचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचाररथाची नासधूस करण्यात आली आहे. तसेच रथ चालकास शिवीगाळ करून धमकावून प्रचाराचा रथ तेथून घेऊन जाण्यास सांगितले. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात राजकीय पक्षाच्या अज्ञात कार्यकर्त्यांविरुद्ध भाजपाद्वारा लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

  

Web Title: BJP candidate Manoj Kotak's campaign was overthrown by demolishing the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.