तलवारीने बर्थ डेचा केक कापणे पडले महागात, कुर्ला येथे ६ तरुणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 21:23 IST2020-12-19T21:22:02+5:302020-12-19T21:23:14+5:30
Crime News : या प्रकरणी १७ वर्षीय तरुणाला समज देऊन त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तलवारीने बर्थ डेचा केक कापणे पडले महागात, कुर्ला येथे ६ तरुणांना अटक
मुंबई : मित्राचा वाढदिवस तलवारीने केक कापून साजरा करणे कुर्ल्यातील तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी समीरउद्दीन अन्सारी (२०), मोहम्मद इद्रिसी (१९) तौफिक शेख (२२), अरबाज शेख (२३), मिसम सय्यद (१९), अमान शेख (१९) या तरुणांना अटक केली आहे.
मृतदेहाचे तुकडे-तुकडे करून फेकले, वरळीतील युवकाची पैशांसाठी नेरळ येथे पती-पत्नीने केली निर्घृण हत्या
कुर्ला पूर्व येथील राजीव गांधी नगर बेस्ट बस डेपोच्या मागे शनिवारी समीरउद्दीन याने त्याच्या मित्रांसोबत जमून त्याच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापला. या वाढदिवसाचा व्हिडिओ बनवून त्याने समाज माध्यमांवर व्हायरल केला. याप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर या तरुणांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. व केक कापण्यासाठी वापरण्यात आलेली तलवार त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी १७ वर्षीय तरुणाला समज देऊन त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.