१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 13:23 IST2025-09-08T13:22:52+5:302025-09-08T13:23:38+5:30

दहावीची विद्यार्थिनी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली, पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

bihari girl and pakistani boy met via train love story | १५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा

१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा

बिहारमधील नवादा येथील दहावीची विद्यार्थिनी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली, पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. फोन आणि अभ्यासावरून मुलीची आई जेव्हा तिला ओरडली तेव्हा मुलीने घर सोडण्याचं मोठं पाऊल उचललं. ती कोणालाही न सांगता ट्रेनमध्ये चढली आणि पाकिस्तानमधील तिच्या मित्राला भेटण्यासाठी निघाली.

मुलगी घरी आली नाही तेव्हा कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. तसेच पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि सर्व्हिलान्सची मदत घेतली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर १५ वर्षांची मुलगी प्रयागराज रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये प्रवास करताना सापडली गेली. आरपीएफने ताबडतोब तिला थांबवलं आणि चाइल्डलाइनच्या स्वाधीन केलं. मुलीच्या फोनमध्ये सापडलेल्या चॅट रेकॉर्डने पोलीस आणि सुरक्षा एजन्सीला धक्का बसला.

तपासात असं दिसून आलं की, विद्यार्थिनी फक्त पाकिस्तानी मुलाशी बोलत नव्हती. पाकिस्तानी नंबरशिवाय, पंजाबमधील एका महिलेशी आणि दिल्लीतील एका महिलेशी सतत बोलत असल्याचे पुरावे देखील तिच्या फोनमध्ये सापडले. चॅट हिस्ट्रीमध्येही असं आढळून आलं की, पंजाबमधील महिलेने पेटीएमद्वारे मुलीला पैसे पाठवले होते. त्याच पैशातून ती ट्रेनचे तिकीट खरेदी करून दिल्लीला निघून गेली. 

चाइल्डलाइनमध्ये मुलीची चौकशी केली असता तिने कबूल केलं की, ती रागाने घराबाहेर पडली होती. तिच्या आईने तिला फटकारलं होतं आणि अभ्यासासाठी तिच्यावर दबाव आणला होता. रागाच्या भरात तिने मोबाईल उचलला, तिकीट काढलं आणि घराबाहेर पडली. पण मोबाईल चॅटवरून हे देखील स्पष्ट झाले की मुलगी अनेक महिन्यांपासून पाकिस्तानी मुलाच्या संपर्कात होती. दोघेही सोशल मीडियावर भेटले आणि नंतर हळूहळू त्यांनी अभ्यास, कुटुंब आणि भविष्याबद्दलही गोष्टी शेअर करण्यास सुरुवात केली.

परदेशातून चॅटिंगची बाब उघडकीस येताच स्थानिक पोलिसांनी संपूर्ण अहवाल सुरक्षा संस्थांना पाठवला. हे प्रकरण एखाद्या मोठ्या नेटवर्कशी जोडलेलं आहे का, की सोशल मीडियावर एका अल्पवयीन मुलीच्या वाढत्या मैत्रीचे आणि त्याच्या निष्काळजीपणाचे परिणाम आहे, याचा तपास तपास यंत्रणांनी सुरू केला आहे. सध्या फोन जप्त करण्यात आला आहे आणि फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे.

या घटनेने मुलीच्या कुटुंबाला हादरवून टाकलं आहे. मुलीच्या बेपत्ता होण्याबद्दल कुटुंब चिंतेत असताना, आता पाकिस्तान कनेक्शन उघड झाल्याने त्यांना आणखी मोठा धक्का बसला आहे. आईने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर चॅटिंगमुळे मुलगी इतकं मोठं पाऊल उचलेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. बिहार पोलिसांनी कुटुंबाला प्रयागराजला बोलावलं आहे आणि बाल कल्याण समिती (CWC) च्या आदेशानंतर विद्यार्थिनीला कुटुंबाकडे सोपवलं जाईल.

Web Title: bihari girl and pakistani boy met via train love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.