अल्पवयीन मुलीला घरी नेऊन अश्लील व्हिडीओ दाखवत होती तरूणी, अनेकदा ठेवले समलैंगिक संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 11:20 IST2021-06-28T11:16:48+5:302021-06-28T11:20:58+5:30

मीडिया रिपोर्टनुसार कसमार भागात एक तरूणी गावातीलच एका अल्पवयीन मुलीला शिवणकाम शिकवण्याच्या बहाण्याने आपल्या घरी घेऊन जात होती.

Bihar : Woman went to jail for having a homosexual relationship with a minor | अल्पवयीन मुलीला घरी नेऊन अश्लील व्हिडीओ दाखवत होती तरूणी, अनेकदा ठेवले समलैंगिक संबंध

अल्पवयीन मुलीला घरी नेऊन अश्लील व्हिडीओ दाखवत होती तरूणी, अनेकदा ठेवले समलैंगिक संबंध

बिहारच्या बोकारो जिल्ह्यातील कसमार भागात एका तरूणीने एका अल्पवयीन मुलीसोबत समलैंगिक संबंध ठेवल्याची तक्रार करण्यात आली होती. ज्यानंतर बेरमो महिला पोलिसांनी आरोपी तरूणीला अटक केली आहे. ही तरूणी अल्पवयीन मुलीला शिवणकाम शिकवण्याच्या बहाण्याने तिचा गैरफायदा घेत होती.

याप्रकरण बेरमो महिला पोलीस स्टेशन प्रभारी गुलाब किस्पोट्टा यांनी सांगितलं की, 'पीडितेच्या वडिलांनी शनिवारी दुपारी लेखी तक्रार दिली होती. ज्यात त्यांनी सांगितलं की, गावातीलच एका तरूणीने त्यांच्या अल्पवयीन मुलीला फसवून तिचं शारीरिक आणि मानसिक शोषण केलं'. त्यांनी केलेल्या या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत शनिवारी सायंकाली तरूणीला घरातून अटक केली.

मीडिया रिपोर्टनुसार कसमार भागात एक तरूणी गावातीलच एका अल्पवयीन मुलीला शिवणकाम शिकवण्याच्या बहाण्याने आपल्या घरी घेऊन जात होती. पीडितेच्या कुटुंबीयांनुसार अल्पवयीन मुलीच्या वडिलांना साधारण २ महिन्यांनंतर समजलं की, आरोपी तरूणी त्यांच्या मुलीला शिवणकाम शिकवण्याच्या बहाण्याने अश्लील व्हिडीओ दाखवते आणि तिच्यासोबत समलैंगिक शारीरिक संबंध ठेवते. (हे पण वाचा : शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ओळख झाली, अत्याचाराचा व्हिडीओ शेअर करून 'त्याने' बदनामी केली)

पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, साधारण चार महिन्यांपूर्वी त्यांची मुलगी घरातून गायब झाली होती. शोधाशोध सुरू केला तर मुलगी दुसऱ्या गावात त्याच तरूणीसोबत सापडली. त्यावेळी कुटुंबीय मुलीला तरूणीच्या तावडीतून घरी घेऊन आले होते. यादरम्यान पुन्हा २४ जूनला त्यांची मुलगी काहीच न सांगता घरातून गायब झाली होती. पुन्हा शोध घेतला तर समजलं  की, तिच तरूणी त्यांच्या मुलीला पळवून नेण्याच्या आणि विकण्याच्या प्रयत्नात होती.

पीडितेच्या वडिलांनी असाही आरोप लावला की, याआधी याच तरूणीने त्यांच्या आणखी एका मुलीला एका तरूणासोबत पळून जाण्यात मदत केली होती. त्या मुलीचं जबरदस्ती तरूणासोबत लग्न लावून देण्यात आलं होतं. या तक्रारीनंतर महिला पोलीस स्टेशनने कारवाई करत तरूणीला अटक केली आहे.
 

Web Title: Bihar : Woman went to jail for having a homosexual relationship with a minor