बहिणीच्या मैत्रिणीसोबत ठेवले शारीरिक संबंध, गर्भवती राहिल्यावर लस्सीतून दिलं औषध आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 14:06 IST2022-05-31T14:05:21+5:302022-05-31T14:06:05+5:30
Bihar Crime News : तरूणाने आधी आपल्या बहिणीच्या मैत्रिणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

बहिणीच्या मैत्रिणीसोबत ठेवले शारीरिक संबंध, गर्भवती राहिल्यावर लस्सीतून दिलं औषध आणि मग...
Bihar Crime News : बिहारच्या समस्तीपूरमध्ये प्रेमाच्या नात्याला काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका दगाबाज तरूणाने आपल्या बहिणीच्या मैत्रिणीसोबत प्रेम केलं. सोबत जगण्या-मरणाच्या शपथा खाल्ल्या आणि जेव्हा ती गर्भवती झाली तेव्हा त्याने असं काही केलं ज्याबाबत वाचून लोक हैराण झाले.
तरूणाने आधी आपल्या बहिणीच्या मैत्रिणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. लग्नाचं आमिष दाखवत त्याने अनेकदा तिच्यासोबत संबंध ठेवले. जेव्हा ती गर्भवती झाली तेव्हा लस्सीमधून औषध देत तिला क्लीनिकमध्ये घेऊन गेला आणि तिचं अबॉर्शन केलं. आता तरूणी वणवण फिरत आहे.
तरूणीने सांगितलं की, तिला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे. पण तो नकार देत आहे. त्याने अनेकदा खोटं सांगून तिची अबॉर्शन केलं. तरूणीने सांगितलं की, गर्भवती झाल्यावर मी तरूणाकडे लग्नासाठी तगादा लावला होता. त्याच्या परिवारासमोरही हात-पाय जोले. पण ते तयार झाले नाही. त्यानंतर मी आपल्या आई-वडिलांना सगळं सांगितलं.
तरूणी म्हणाली की, दोघेही माझ्यासोबत त्याच्या घरी आले. त्याच्या परिवारासोबत चर्चा केली. पण ते तयार झाले नाही. प्रकरणाची गावात चर्चा होऊ लागली होती. त्यानंतर तरूणाच्या आईचा फोन तरूणीला आला. तेव्हा तरूणाची आई म्हणाली की, ते लग्नासाठी तयार आहेत. तरूणी जेव्हा परिवारासोबत पुन्हा त्याच्या घरी गेली तेव्हा तरूणाची आई तिला म्हणाली की, तू थकली असशील काहीतरी खाऊन-पिऊन घे.
लस्सीमध्ये त्यांनी काहीतरी मिक्स करून दिलं. ज्यानंतर तरूणीला ब्लीडिंग सुरू झालं. तरूणाच्या कुटुंबियांनी दगा देत तिचं अबॉर्शन केलं. तरूणीची तब्येत बिघडली तेव्हा आई-वडील तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यानंतर तरूणीने पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलीस अधिकारी कुमार ब्रजेश म्हणाले की, पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तरूणीचं मेडिकल करण्यात आलंय. मात्र, आरोपी घटनेनंतर फरार झाले आहेत. त्यांना अटक करण्यासाठी पोलीस छापेमारी करत आहेत.