कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 11:50 IST2025-10-22T11:50:13+5:302025-10-22T11:50:57+5:30

गोपाळगंजमधील एका घरावर छापा टाकण्यात आला, जिथून १ कोटी ५४९ हजार ८५० रुपये रोख, ३४४ ग्रॅम सोनं आणि १.७५ किलो चांदी जप्त करण्यात आली.

bihar police busts cyber fraud network and seizes cash and jewellery | कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण

कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण

सायबर फसवणुकीविरुद्धच्या मोठ्या कारवाईत बिहारमधील गोपाळगंज येथे पोलिसांनी एका चहा विक्रेत्याच्या घरातून १ कोटी रुपयांहून अधिक रोख, ३४४ ग्रॅम सोनं, १.७५ किलो चांदी आणि सायबर फसवणुकीशी संबंधित अनेक वस्तू जप्त केल्या. या छाप्यात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली, जे सख्खे भाऊ आहेत.

सायबर डीएसपी अवंतिका दिलीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या माहितीच्या आधारे १७ ऑक्टोबर रोजी गोपाळगंजमधील एका घरावर छापा टाकण्यात आला, जिथून १ कोटी ५४९ हजार ८५० रुपये रोख, ३४४ ग्रॅम सोनं आणि १.७५ किलो चांदी जप्त करण्यात आली. आरोपींकडून ८५ एटीएम कार्ड, ७५ बँक पासबुक, २८ चेकबुक, दोन लॅपटॉप, तीन मोबाईल आणि एक आलिशान कार देखील जप्त करण्यात आली. या कारवाईत अभिषेक कुमार आणि आदित्य कुमार या दोन भावांना अटक करण्यात आली.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपी अभिषेक कुमार पूर्वी चहाचं दुकान चालवत होता. नंतर तो दुबईला गेला, जिथे त्याने हे सायबर फसवणूक नेटवर्क चालवण्यास सुरुवात केली. त्याचा भाऊ आदित्य कुमार गावात राहत होता आणि त्याला या बेकायदेशीर कृत्यात मदत करत होता. सुरुवातीच्या तपासात असं दिसून आलं की ही गँग विविध बँक खात्यांमधून पैसे मागण्यासाठी आणि नंतर रोख व्यवहार करण्यासाठी सायबर फसवणूक करत होती. पोलिसांना संशय आहे की, या नेटवर्कमध्ये इतर अनेक व्यक्तींचा सहभाग असू शकतो आणि ते राज्याबाहेर पसरलेले आहे.

पोलिसांनी सांगितले की, छाप्यादरम्यान जप्त केलेल्या एटीएम कार्ड आणि पासबुकची तपासणी केल्यावर असं दिसून आलं की बहुतेक पासबुक बंगळुरूची आहेत, ज्यामुळे पोलीस आणि सायबर सेल पथकांना या प्रकरणाचा तपास करण्यास भाग पाडलं. ही खाती राष्ट्रीय स्तरावरील सायबर नेटवर्कशी संबंधित होती का याचाही पोलीस तपास करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने आणि सायबर फसवणुकीशी संबंधित वस्तू सापडल्यानंतर, आयकर विभाग आणि एटीएसचे पथके देखील गोपाळगंजमध्ये पोहोचले आहेत आणि अटक केलेल्या आरोपींची चौकशी करत आहेत.

Web Title : चाय वाले का साइबर फ्रॉड का भंडाफोड़: करोड़ों जब्त, पुलिस हैरान

Web Summary : बिहार पुलिस ने एक चाय विक्रेता द्वारा चलाए जा रहे एक बड़े साइबर धोखाधड़ी का पर्दाफाश किया। उन्होंने करोड़ों नकद, सोना, चांदी, एटीएम और पासबुक जब्त किए। दो भाइयों को गिरफ्तार किया गया, जो पूरे देश में बैंक खातों से पैसे निकालने में शामिल थे।

Web Title : Tea Seller's Cyber Fraud Busted: Crores Seized, Police Stunned

Web Summary : Bihar police uncovered a massive cyber fraud operation run by a tea seller. They seized crores in cash, gold, silver, ATMs, and passbooks. Two brothers were arrested for running the scam, which involved siphoning money from bank accounts across the nation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.