ऑनलाइन साइटवरून पडले प्रेमात, मग प्रियकराने अश्लील फोटो व्हायरल करून मोडलं तिचं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 13:34 IST2021-08-05T13:31:48+5:302021-08-05T13:34:25+5:30
फ्रेन्ड रिक्वेस्ट आणि ऑनलाइन चॅटींगनंतर मजेत त्याला प्रेम नाव दिलं जातं. पण त्याच्या परिणामाबाबत कुणी विचारच करत नाहीत.

ऑनलाइन साइटवरून पडले प्रेमात, मग प्रियकराने अश्लील फोटो व्हायरल करून मोडलं तिचं लग्न
अलिकडे सोशल मीडिया साइटवरून तरूण-तरूणी प्रेमात पडण्याचा जणू ट्रेन्ड सुरू आहे. पण या ऑनलाइन जमान्यातील प्रेम केवळ गंमत बनून राहिलं आहे. अशाप्रकारे झालेल्या प्रेमात कधी कुणासोबत काय होईल काहीच सांगता येत नाही. फ्रेन्ड रिक्वेस्ट आणि ऑनलाइन चॅटींगनंतर मजेत त्याला प्रेम नाव दिलं जातं. पण त्याच्या परिणामाबाबत कुणी विचारच करत नाहीत.
अशीच एक घटना बिहारच्या सीतामढीतून समोर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झालेल्या प्रेमानंतर प्रेयसीचं लग्न ठरल्याची माहिती मिळताच नाराज प्रियकराने तरूणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे तिचं लग्न मोडलं. तरूणीने फेक आयडी तयार करून तरूणीचा एक अश्लील फोटो फेसबुकवर व्हायरल केला. तरूणाच्या या कृत्यामुळे हैराण झालेल्या तरूणीच्या परिवाराने तरूणाविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. (हे पण वाचा : पत्नीने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन केली पतीची हत्या)
पोलिसात दिलेल्या तक्रारीत तरूणीच्या काकांनी सांगितलं की, आरोपी तरूणाचं त्याच्या पुतणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. याची खबर तरूणीच्या आई-वडिलांना लागली तर त्यांनी घाईघाईत पुतणीचं लग्न दुसऱ्या तरूणासोबत ठरवलं. तरूणीचं लग्न ठरल्याची माहिती मिळताच नाराज तरूणाने तरूणीचे अश्लील फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवले.
या कारणाने तरूणीचं लग्न मोडलं. याबाबत पीडित परिवाराने आपल्या काही नातेवाईकांना सोबत घेऊन आरोपी तरूणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तो टाळाटाळ करत होता. असं न करण्याची सूचना त्याला दिली तर त्याने मारहाण केली.
आरोपी तरूण तीन ते चार दिवसांच्या अंतराने फेक फेसबुक आयडीवरून तरूणीचे अश्लील फोटो पोस्ट करतो. तरूणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने परिवारातील लोक चिंतेत आहे. याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. तरूणाला लवकरच अटक केली जाईल असा दावा केला जात आहे.