विधवा आईशी अवैध संबंध; संतापलेल्या पुतण्याने काकाला 14 गोळ्या झाडून संपवले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 21:24 IST2025-12-03T21:07:14+5:302025-12-03T21:24:17+5:30
Bihar Crime: वारंवार इशारा देऊनही संबंध सुरू ठेवल्याने पुतण्या संतापला.

विधवा आईशी अवैध संबंध; संतापलेल्या पुतण्याने काकाला 14 गोळ्या झाडून संपवले...
Bihar Crime:बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील गम्हरिया क्षेत्रातील सिहपूर येथे 25 नोव्हेंबरच्या रात्री रविंद्र शर्मा यांची निर्घृण हत्या झाली होती. या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. बुधवारी सदर थाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत एसपी संदीप सिंह यांनी या प्रकरणाची माहिती दिली.
पुतण्याने काढला काकाचा काटा...
आरोपी गुड्डू कुमारने चौकशीत कबुल केले की, रविंद्र शर्माचे त्याच्या विधवा आईशी अवैध संबंध होते. या संबंधांना त्याचा तीव्र विरोध होता. त्याने अनेक वेळा इशारा दिल्यानंतरही रविंद्र शर्मा संबंध चालूच ठेवत होता, ज्यामुळे कुटुंब आणि समाजात बदनामी होत होती. याच कारणामुळे गुड्डूने आपला भावा प्रिंस कुमार आणि मित्र मनीष कुमार यांच्यासोबत मिळून काकाची हत्या करण्याची योजना आखली.
काकावर 14 गोळ्या झाडल्या
25 नोव्हेंबरच्या संध्याकाळी सिहपूर हनुमान मंदिराजवळ तिघांनीही रविंद्र शर्माला घेरले आणि अंधाधुंद गोळीबार केला. एकूण 14 गोळ्या लागल्याने रविंद्र शर्माचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मृताची पत्नी चुन्नी देवी यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दिली होती. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन एसपींनी एसडीपीओच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार केले. मोबाइल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक सूत्रांवरून गुड्डू कुमार याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने संपूर्ण कटाचा खुलासा केला.
शस्त्रसाठा जप्त; तीनही आरोपी न्यायालयीन कोठडीत
गुड्डूच्या माहितीच्या आधारे उर्वरित दोन आरोपींनाही अटक करण्यात आली. मनीष कुमारकडून पोलिसांनी एक देशी पिस्तूल, एक देशी कट्टा आणि चार जिवंत कारतूस जप्त केले. तिघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.