मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 21:45 IST2025-07-29T21:44:19+5:302025-07-29T21:45:17+5:30
Crime News: पोलिसांनी दोन नराधमांना केली अटक, कारही घेतली ताब्यात

मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
Bihar Crime News: सध्या देशात गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. नुकतीच बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. बिहारमध्ये पोलिसांनी पिंटू शर्मा (२५) आणि गणेश साह (३२) या दोघा नराधमांना अटक केली. त्यांनी किशोरवयीन मुलीवर कारमध्ये गुन्हेगारांनी बलात्कार केला. त्यानंतर, किशोरीच्या डोक्यावर रॉडने हल्ला करून पुपरी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात फेकून दिले. दोघांनीही पोलिसांना सांगितले की, त्यांनी कारमध्ये किशोरीवर बलात्कार केला होता. त्यानंतर, त्यांनी तिच्या डोक्यावर रॉडने मारले आणि तिला सीतामढीच्या पुपरी सीमेवर नेले आणि तिथे फेकून दिले. पोलिसांनी ती कारही जप्त केली आहे.
नेमका कसा घडला प्रकार
मोबाईलच्या दुकानात गेलेल्या मुलीला आत खेचून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. नराधम इतक्यावर थांबला नाही. त्याने आणखी एका साथीदाराला बोलवून तिला कारमधून बाहेर नेले आणि कारमध्येही तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. २६ जुलैच्या संध्याकाळपासून ही किशोरी बेपत्ता होती. कुटुंबाने २७ जुलै रोजी पोलिसांना माहिती दिली. शोध घेतल्यानंतर मुलगी पुपरी येथे सापडली. कुटुंबाने फोटोवरून मुलीची ओळख पटवली. मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला गेला आणि नंतर तिला मारहाण करून रस्त्यावर फेकून देण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी पिंटू आणि गणेश या दोघांना अटक केली असून, दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला.
कारमध्ये सापडले रक्ताचे डाग
एएसपी पूर्व शहरेयार अख्तर दोघांनाही गुन्ह्याच्या ठिकाणी घेऊन गेले, जिथे गुन्ह्याचे दृश्य रिक्रिएट करण्यात आले. FSL तपासात कारमध्ये बलात्काराचे पुरावे सापडले. किशोरीला रॉडने मारल्यानंतर तिच्या डोक्यातून वाहिलेल्या रक्ताचे डागही कारमध्ये सापडले. किशोरीवर पुपरी परिसरात बलात्कार करण्यात आला. दोन्ही आरोपींनी गाडी पार्क केल्यानंतर बलात्कार केल्याची ती जागाही पोलिसांना सांगितली.
मुलीला आत खेचून शटर लावून घेतलं...
२६ जुलै रोजी, किशोरी गावातील चौकातील बाजारपेठेतील पिंटू शर्माच्या दुकानात तिचा मोबाईल रिचार्ज करण्यासाठी गेली. ती दुकानात पोहोचताच पिंटूने तिला आत ओढले आणि शटर खाली केले. त्यानंतर, त्याने गणेशला बोलावले. गणेश आणि पिंटूने मिळून दुकानाच्या आत तिच्यावर बलात्कार केला, नंतर तिला गाडीत नेले आणि दोघांनीही गाडीत तिच्यावर बलात्कार केला. FSL तपासात दुकानाच्या आतही बलात्काराचे पुरावे सापडले आहेत.
मोबाइलमध्ये सापडले न्यूड व्हिडिओ
पोलिसांनी गणेशचा मोबाईल जप्त केला. पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये अनेक न्यूड व्हिडिओ आणि अश्लील ऑडिओ सापडले आहेत. त्या सर्व व्हिडिओंबाबत पोलिस त्याची चौकशी करत आहेत. गणेशचा प्रेमविवाह झाला असून त्याची पत्नी त्याला पोलिस स्टेशनमध्ये भेटायलाही आली होती.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
गणेशने बाजारात लावलेले सीसीटीव्ही गायब करायचा प्रयत्न केला. डीबी बॉक्स आणि कॅमेरे देखील काढून टाकण्याले. पोलीस गणेशच्या कुटुंबावर सीसीटीव्हीचा डीबी बॉक्स देण्यासाठी दबाव आणत आहेत.
मुलीच्या तब्येतीत आता सुधारणा
मुलीच्या शरीरातून खूप रक्त वाया गेले होते आणि तिची हिमोग्लोबिन पातळी कमी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी दुकानदार पिंटूला ताब्यात घेतले. सीतामढी सदर रुग्णालयातून मुलीला एसकेएमसीएच येथे रेफर करण्यात आले. एएसपी पूर्व शहरेयार अख्तर यांनी सांगितले की, मुलीवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. रक्तदानानंतर मुलीची प्रकृती सुधारत आहे.