ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:52 IST2025-06-30T12:51:47+5:302025-06-30T12:52:27+5:30

Bihar Crime: गोळी मारुन आरोपींनी पळ काढला; ज्याला गोळी लागली त्याला कळालेही नाही.

Bihar Crime, Alone fought with robbers; Bullet entered his waist, he didn't even know until 2 km | ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

Bihar Crime: बिहारमधून लुटीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मुझफ्फरपूरमध्ये दरोडेखोरांनी एका सिव्हिल इंजिनिअरची साखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. याला त्या इंजिनिअरने जोरदार विरोध केला, तो एकटा दरोडेखोरांशी भिडला. या झटापटीदरम्यान, आरोपींनी त्याच्यावर गोळी झाडली, गोळी त्याच्या कमरेत घुसली. पण, चमत्कारीक बाब म्हणजे, त्या व्यक्तीला गोळी लागल्याचे कळाले नाही. २ किलोमीटर दूरवर गेल्यानंतर इतर लोकांनी त्याला कमरेतून रक्त येत असल्याचे सांगितले. सध्या इंजिनिअरवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर माहिती अशी की, बंगळुरुमध्ये काम करणारे ३५ वर्षीय गोविंद शर्मा त्याच्या आजीच्या घरी दुचाकीवरुन जात होते. यावेळी दुचाकीस्वार दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्यातील साखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. याला गोविंदने जोरदार विरोध केला, तो एकट्याने दरोडेखोरांशी झुंजला. या झटापटीत साखळीचा एक भाग दरोडेखोरांकडे राहिला, तर दुसरा भाग गोविंदकडे. या दरम्यान, दरोडेखोरांनी गोविंदच्या कमरेवर गोळी झाडली पळ काढला. परंतु गोविंदला गोळी लागल्याचे कळलेही नाही. 

दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

घटनास्थळापासून दोन किलोमीटर पुढे गेल्यावर रस्त्याने जाणाऱ्यांनी त्याच्या कंबरेतून रक्त येताना पाहिले आणि गोविंदला सांगितले, तेव्हा त्याला गोळी लागल्याचे कळले. यानंतर जखमी गोविंदने ताबडतोब त्याच्या कुटुंबाला आणि पोलिसांना माहिती दिली. दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. तसेच, जखमी गोविंदला ताबडतोब एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सुदैवाने डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे गोविंदच्या कंबरेत अडकलेली गोळी यशस्वीरित्या काढली आहे. पोलिसांनी गोविंदचा जबाब नोंदवला असून, त्या आधारे तपास सुरू केला आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत. शिवाय, दरोडेखोरांना पकडण्यासाठी विविध ठिकाणी छापेही टाकले जात आहेत.

Web Title: Bihar Crime, Alone fought with robbers; Bullet entered his waist, he didn't even know until 2 km