मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 22:47 IST2025-06-21T22:46:40+5:302025-06-21T22:47:19+5:30

राजा रघुवंशीचा मृतदेह मेघालयहून इंदूरमधील त्याच्या घरी पोहोचण्यापूर्वीच आरोपी राज कुशवाह राजाच्या घरी पोहोचला होता.

Big revelation! Raj Kushwaha was keeping Sonam informed about every moment from bringing the king's body home to the funeral... | मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 

मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 

राजा रघुवंशी यांच्या हत्याकांडातील तपासात आणखी एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज त्या दिवसाचे असल्याचे सांगितले जात आहे, जेव्हा राजाचा मृतदेह मेघालयहून इंदूरमधील त्याच्या घरी आणला गेला होता. या फुटेजमध्ये पोलिसांना राजाच्या हत्येमध्ये सहभागी असलेला आरोपी राज कुशवाह हा सोनमचे वडील देवी सिंग यांच्यासोबत दिसला आहे.

मृतदेह येण्यापूर्वीच आरोपी राज राजाच्या घरी!
पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राज कुशवाह सोनमच्या वडिलांना धीर देत असल्याचे दिसले होते. त्याला या संपूर्ण गुन्ह्याची आधीपासूनच माहिती होती. सीसीटीव्हीमध्ये हेही दिसत होते की, तो फोनवर सतत कोणाशी तरी बोलत होता. राजाच्या घरी सुरू असलेल्या घडामोडींची माहिती तो सोनमला देत असावा, अशी पोलिसांना शंका आली होती.

राजा रघुवंशीचा मृतदेह मेघालयहून इंदूरमधील त्याच्या घरी पोहोचण्यापूर्वीच आरोपी राज कुशवाह राजाच्या घरी पोहोचला होता. ४ जून रोजी समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, राज कुशवाह तिथे एकटा नव्हता. त्याच्यासोबत आणखी काही लोक होते.

'ऑपरेशन हनीमून' आणि खळबळजनक खुलासे
इंदूरचे व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या मेघालयमधील हत्येची ही कथा एखाद्या थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नाही. लग्नाच्या अवघ्या १२ दिवसांनंतर हनीमूनच्या बहाण्याने सुरू झालेला हा रक्तरंजित खेळ आता खळबळजनक खुलास्यांसह चर्चेत आहे. मेघालय पोलिसांनी या प्रकरणाला 'ऑपरेशन हनीमून' असे नाव दिले आहे.

तपासाला वेग, आरोपी रिमांडवर
ट्रान्सपोर्टर राजा रघुवंशी हत्याकांडात शिलाँग पोलिसांचा तपास सुरूच आहे. हत्याकांडातील सोनम रघुवंशी, राज कुशवाह, विशाल उर्फ विक्की चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी या सर्व आरोपींना रिमांडवर घेतलेल्या शिलाँग पोलिसांनी गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करून फक्त राज आणि सोनमला दुसऱ्यांदा रिमांडवर घेतले आहे.

इंदूरमध्ये दाखल झालेली शिलाँग पोलिसांची दुसरी टीम सातत्याने तपास करत आहे. शनिवारपर्यंत सोनम आणि राजचा दुसऱ्यांदा मिळालेला रिमांडही पूर्ण होत आहे. अशा परिस्थितीत, शिलाँग पोलीस दोघांना पुन्हा रिमांडवर घेणार की त्यांना कारागृहात पाठवणार, हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान, इंदूरमध्ये असलेली शिलाँग पोलिसांची टीम गोविंदच्या हवाला व्यवसायाची चौकशी करत आहे. तसेच, सोनमने राजाच्या हत्येनंतर इंदूरमधील देवास नाका येथील फ्लॅटवर आणलेल्या काळ्या बॅगचा शोध घेत आहे.

Web Title: Big revelation! Raj Kushwaha was keeping Sonam informed about every moment from bringing the king's body home to the funeral...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.