VIDEO: पती-पत्नीने अल्टो कारमधून नेला मृतदेह; सीसीटीव्ही फुटेज आणि पेटीने समोर आणलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 11:42 IST2025-06-25T11:39:28+5:302025-06-25T11:42:01+5:30
छत्तीसगडमधील किशोर पैकरा हत्येप्रकरणी वकील जोडप्याला अटक करण्यात आली आहे.

VIDEO: पती-पत्नीने अल्टो कारमधून नेला मृतदेह; सीसीटीव्ही फुटेज आणि पेटीने समोर आणलं सत्य
Raipur Suitcase Murder Case: छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील बहुचर्चित सूटकेस हत्याकांड प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. मृत किशोर पैकरा यांची हत्या जमिनीच्या व्यवहारातून करण्यात आल्याचे तपासातून समोर आलं. याप्रकरणी आरोपी वकील अंकित उपाध्याय आणि त्याची पत्नी शिवानी शर्माला अटक करण्यात आली. आरोपींनी किशोर पैकरा यांची हत्या करुन मृतदेह एका स्टीलच्या पेटीत भरुन त्यात सिमेंट टाकलं होतं. आता आरोपी ही पेटी एका कारमधून घेत जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. गुन्हा करण्यासाठी आरोपींनी गाडीला बनावट नंबर प्लेटही लावली होती.
आरोपी अंकित उपाध्याय आणि शिवानी शर्मा किशोर यांना बऱ्याच काळापासून ओळखत होते. या ओळखीचा फायदा घेत त्यांनी किशोर यांचा विश्वास जिंकला आणि नंतर त्यांची हत्या केली. ६० वर्षीय किशोर पैकरा घरात एकटेच राहत होते. शारीरिकदृष्ट्या अपंग असलेले किशोर व्हीलचेअरवर फिरत असत. आरोपी अंकित उपाध्यायने त्यांच्या एका जमिनीचा व्यवहार केला होता. मात्र त्याने किशोर यांना कमी पैसे दिले. याबाबत विचारणा केली असता आरोपी जोडप्याने त्यांना संपवण्याचा कट रचला. या प्रकरणात पोलिसांनी दोन प्रॉपर्टी डीलर्सनाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपी पत्र्याची पेटी घेऊन जात असल्यापासून ते हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापर्यंत सगळं काही सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं आहे.
किशोर यांची मोहंडी गावातील जमीन होती. ती अंकित उपाध्याय आणि शिवानी यांच्यामार्फत ५० लाख रुपयांना विकण्यात आली. जेव्हा जमीन ५० लाख रुपयांना विकली गेली तेव्हा आरोपींनी किशोर यांना केवळ ३० लाख रुपये दिले. जेव्हा किशोर यांना २० लाख रुपये कमी मिळाल्याचे कळले तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून उर्वरित पैसे मागितले. आपण पकडले जाऊ या भीतीने अंकित उपाध्याय आणि शिवानी शर्मा यांनी मिळून किशोरी यांची हत्या केली. हत्येनंतर त्यांनी मृतदेह स्टीलच्या पेटीमध्ये टाकला आणि त्यात सिमेंट ओतले. त्यानंतर आरोपींनी पेट रायपूरमधील इंद्रप्रस्थ नावाच्या कॉलनीतील एका निर्जन भागात फेकून दिली. आरोपी तिथून दिल्लीला पळून गेले.
इस आल्टो कार की डिक्की में किशोर की लाश है।
— Madan Mohan Soni (@madanjournalist) June 24, 2025
रायपुर
किशोर पैकरा की लाश एक ट्रंक में मिली, जिसे अल्टो कार की डिक्की में रखा गया था। ट्रंक पर सीमेंट का प्लास्टर भी चढ़ाया गया था।
किशोर ने अंकित और शिवानी को 50 लाख में एक प्रॉपर्टी बेची थी। 30 लाख मिल गए, लेकिन बाकी 20 लाख के लिए… pic.twitter.com/XnyBNtbEiP
पोलिसांना मृतदेह सापडल्यानंतर त्यांनी पेटीवरुन तपास सुरु केला. पोलिसांनी तपास केला तेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंकित आणि शिवानी पेटी खरेदी करताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा दोन व्यक्ती लिफ्टमधून तिच पेटी घेऊन येताना दिसले. आणखी एका सीसीटीव्हीमध्ये ती पेटी कारमधून घेऊन जाताना दिसत आहेत. या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी अंकित उपाध्याय आणि त्याची पत्नी शिवानी शर्मा यांना दिल्लीतून अटक केली आहे.