शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

मोठी कारवाई! बॉम्बस्फोटातील फरार दहशतवाद्याला कानपूरमधून घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 5:51 PM

१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातही त्याचा सहभाग होता.

ठळक मुद्देतो फरार झाल्यानंतर रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. ५० पेक्षा जास्त बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता.महाराष्ट्र एटीएसने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने कानपूर येथून जलीलला ताब्यात घेतले. 

मुंबई - राजस्थानच्या अजमेर येथील बॉम्बस्फोटात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला फरार दहशतवादी डॉ.मोहम्मद जलीस शफी उल्ला अन्सारीला (६८) महाराष्ट्र एटीएसने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने कानपूर येथून ताब्यात घेतले आहे. हा फरार आरोपी पॅरोलवर असताना फरार झाला आहे. मुंबईतील आग्रीपाडा येथीस मोमीन पाडाच्या बीआयटी चाळीत तो कुटुंबियांसोबत रहात होता. तो बेपत्ता असल्याची तक्रार आग्रीपाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.कुख्यात दहशतवादी डॉ. जलीस अन्सारीला कानपूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

५० पेक्षा जास्त बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता. त्यामुळे त्याला डॉ. बॉम्ब म्हणून देखील ओळखतात. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातही त्याचा सहभाग होता. त्यामुळे तो फरार झाल्यानंतर रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. 

कोण आहे डॉ. जलील अन्सारी ?मुंबई महानगरपालिकेत डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या जलील अन्सारीने बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतर करीम तुंडाच्या संपर्कात येऊन नव्वदीच्या शतकात पाकिस्तानमध्ये जाऊन बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर बॉम्ब बनवण्यामध्ये नैपुण्य मिळवले. १९९२ साली राजस्थानच्या अजमेर बॉम्बस्फोट घडवून आणला होता. अजमेर ब्लास्टमधील त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कोर्टाने त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटातला दोषी दहशतवादी जलीस अन्सारी फरारनुकताच ६८ वर्षीय जलील २१ दिवसांचा पॅरोलवर बाहेर आला होता. पॅरोल मंजूर झालेल्या अन्सारीला दर दिवशी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात १०.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान हजेरी लावण्याच्या अटीवर पॅरोल मंजूर करण्यात आला होता. मात्र, १६ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता घरातून नमाज पठण करण्यासाठी जात असल्याचे सांगून तो अचानक गायब झाला. अन्सारीचा शोध न लागल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यांमध्ये तो गायब झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जलील अन्सारी याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने कानपूर येथून जलीलला ताब्यात घेतले. 

 

टॅग्स :terroristदहशतवादीArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेशAnti Terrorist SquadएटीएसPoliceपोलिसBombsस्फोटकेBlastस्फोट