भूत उतरविण्याच्या बहाण्याने १६ वर्षीय पीडितेवर भोंदूबाबाचा बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 10:42 PM2021-09-20T22:42:35+5:302021-09-20T22:43:15+5:30

Rape Case :आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडित मुलगी आरोपी उमेश सोबत जुलै २०२० रोजी दुचाकीवरून  तांत्रिक भोंदू बाबाकडे गेली होती. 

Bhondubaba rapes 16-year-old victim under the pretext of exorcism | भूत उतरविण्याच्या बहाण्याने १६ वर्षीय पीडितेवर भोंदूबाबाचा बलात्कार 

भूत उतरविण्याच्या बहाण्याने १६ वर्षीय पीडितेवर भोंदूबाबाचा बलात्कार 

Next
ठळक मुद्देया गुन्ह्यातील भोंदूबाबाला मदत केल्याप्रकरणी पीडितेची आई (वय ३४) व आईचा साथीदार ( वय ३५) या दोघांनाही अटक केली आहे.

भिवंडी -  १६ वर्षीय पीडितेला भोंदूबाबाने भुताची भीती दाखवून तुझा मृत झालेल्या काकाचा भूत तुझ्या मानगुटीवर बसले आहे. त्यामुळे पूजापाठ आणि तंत्रमंत्र विद्याकरून हा भूत काढला तरच तुझी दुखत असलेली मान ठीक होईल. असा बहाणा करून अल्पवयीन पीडितेला जंगलात नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अत्याचार व पोक्सो कायद्याअंतर्गतसह महारष्ट्र नरबळी इतर अमानुष व अघोरी प्रथा व जादूटोना कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी भोंदूबाबाला  बेड्या ठोकल्या आहे. शांताराम जिवड्या शेळके (वय ६१, रा.  भिवंडी) असे अत्याचार केल्याप्रकरणी अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. तर या गुन्ह्यातील भोंदूबाबाला मदत केल्याप्रकरणी पीडितेची आई (वय ३४) व आईचा साथीदार ( वय ३५) या दोघांनाही अटक केली आहे.

पीडित मुलगी भिवंडीतील नरपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटूंबासह राहत असून दोन वर्षांपूर्वी तिच्या काकाचे निधन झाले. तेव्हापासून पीडित मुलीची मान वाकडी होऊन दुखत होती. त्यामुळे पीडितेच्या आईने तिच्यावर दोन  रुग्णालयात उपचार केले. मात्र मानेचा त्रास कमी होत नव्हता. त्यामुळे  पीडितेच्या आईचा साथीदार उमेश हा पीडितेच्या घरी येऊन सांगत होता कि,  माझ्या ओळखीचा एक तांत्रिक बाबा आहे. तो  पूजापाठ करून मान ठीक करून देईल. त्यामुळे आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडित मुलगी आरोपी उमेश सोबत जुलै २०२० रोजी दुचाकीवरून  तांत्रिक भोंदू बाबाकडे गेली होती. 

भोंदूबाबाच्या घरी गेल्यावर पीडित मुलीला बहाणा केला कि,  मृत झालेल्या तुझ्या काकाचे भूत तुझ्या मानगुटीवर बसले आहे. त्यामुळे  पूजापाठ आणि तंत्रमंत्र विद्याकरून हा भूत काढला तरच  तुझी दुखत असलेली मान ठीक होईल. असा बहाणाकरून अल्पवयीन पीडितेला गावानजीक असलेल्या जंगलात रात्रीच्या सुमारास नेले. त्यावेळी जंगलात पोहचताच आरोपी उमेशला भोंदूबाबाने रस्त्यावरच थांबऊन पीडितेला तो जंगलातील एका झाडाखाली घेऊन गेला. त्यानंतर सोबत हळद कुंकू, गुलाल, अबीर, सेंदूर , लिंबू टायपिन पाकीट आणि तांत्रिक पूजापाठ करण्यासाठी आणलेले साहित्य ठेवून तुझी आरती करायची असल्याचे सांगून अंगावरील कपडे काढण्यास सांगितले. त्यानंतर पीडितेने अंगावरील कपडे काढताच नराधम भोंदूबाबाने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. तर या घटनेची कुठेही वाचता करायची नाही. म्हणून पीडितेच्या आईने व आरोपी उमेशने तिला सांगितले. दुसरीकडे तिच्या सोबत घडलेल्या प्रकाराने पीडिता मानसिक दबावाखाली होती. 

          

पीडितेची काकू शेजारी राहत असून त्यांच्या घरी गणपतीचे विसर्जन असल्याने पीडिता तेथे गेली होती. त्यावेळी पीडिता रडत असल्याचे व मानसिक दबावात असल्याचे  पाहून तिच्याकडे काकूनी विचारपूस केली असता, काकूला पीडितेने तिच्यावर घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनतर तातडीने पीडितेने घेऊन काकूने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन पीडितेवर घडलेला प्रसंगाचे कथन केले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या तक्रारीवरून नराधम भोंदूबाबावर अत्याचारसह पोक्सो कायदा तसेच महारष्ट्र नरबळी इतर अमानुष व अघोरी प्रथा व जादू टोना कायद्यानुसार गुन्हा दाखल करून नारपोली पोलिसांनी भोंदूबाबा बेड्या ठोकल्या आहे. तर गुन्ह्यात नराधमाला मदत करणारी पीडितेची आई व तिचा साथीदार उमेश अशा तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 

Web Title: Bhondubaba rapes 16-year-old victim under the pretext of exorcism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app