VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 20:56 IST2025-07-23T20:49:48+5:302025-07-23T20:56:46+5:30

Bhiwandi fighting video: टेम्पो थांबवायला सांगितला तरीही चालक थांबला नाही, त्यानंतर प्रकरण तापलं

bhiwandi fighting video violent clash between tempo driver and traffic police in Bhiwandi VIDEO goes viral | VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी

VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी

Bhiwandi fighting video: पूर्णा गावाजवळ वाहतूक पोलीस व वाहन चालकामध्ये बुधवारी दुपारी झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाहतूक पोलिस विजय चव्हाण यांनी टेम्पो चालकास वाहतूक कोंडीमुळे टेम्पो थांबवण्याचा इशारा दिला. परंतु टेम्पो चालकाने टेम्पो न थांबवल्याने वाहतूक पोलिस व वॉर्डन यांनी टेम्पो चालकास थांबवून जाब विचारला. त्यावेळी टेम्पो चालकाने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

यावेळी टेम्पो चालकास खाली उतरवण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिस करत असताना टेम्पो चालकाने वाहतूक पोलिस विजय चव्हाण यांना ठोसे मारण्यास सुरूवात केली.या घटनेचा संपूर्ण प्रकार मोबाईल मध्ये चित्रित झाल्याने मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.या प्रकरणी विजय चव्हाण यांनी नारपोली पोलिस ठाण्यात टेम्पो चालका विरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Web Title: bhiwandi fighting video violent clash between tempo driver and traffic police in Bhiwandi VIDEO goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.