भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 15:15 IST2019-09-13T15:14:57+5:302019-09-13T15:15:33+5:30
Bhima Koregaon Case : आरोपांची चौकशी व्हायला हवी असे कोर्टाने म्हटले आहे.

भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली
मुंबई - शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा यांची याचिका आज हायकोर्टाने फेटाळली. पुणे पोलीसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यास हायकोर्टाने नकार दिला असून आरोपांची चौकशी व्हायला हवी असे कोर्टाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी तीन आठवड्यांचा अवधी देण्यात आला असून तोपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी आज पार पडली असून त्यावेळी हे आदेश हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली आहेत.
मुंबई - शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा यांची याचिका हायकोर्टानं फेटाळली https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) September 13, 2019