खिडकीतून प्रियकराला इशारा, रंगावरून पतीचा अपमान करुन झोपेतच संपवले, पत्नीच्या क्रूरतेची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 09:14 IST2026-04-10T09:10:43+5:302026-04-10T09:14:51+5:30

मध्य प्रदेशात देवकृष्ण पुरोहित हत्याकांडाबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Betrayal in Dhar Woman Hires Hitman for 1 Lakh to Kill Husband Fakes Robbery to Mislead Police | खिडकीतून प्रियकराला इशारा, रंगावरून पतीचा अपमान करुन झोपेतच संपवले, पत्नीच्या क्रूरतेची कहाणी

खिडकीतून प्रियकराला इशारा, रंगावरून पतीचा अपमान करुन झोपेतच संपवले, पत्नीच्या क्रूरतेची कहाणी

Dhar Wife Killed Husband: मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात देवकृष्ण पुरोहित हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून एका कुटुंबाची राखरांगोळी करणाऱ्या प्रियंकाची सर्वत्र चर्चा आहे. आरोपी पत्नी प्रियंकाला अटक झाल्यानंतर मृत देवकृष्णच्या आई आणि बहिणीने जो खुलासा केला आहे, तो ऐकून अनेकांना धक्का बसला. घराच्या चार भिंतींच्या आड गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते, ज्याचा शेवट देवकृष्णच्या हत्येने झाला.

'तू मला डिझर्व्ह करत नाहीस'

मृत देवकृष्णची बहीण ज्योती हिने प्रियंकाच्या क्रूर वागणुकीची माहिती दिली. प्रियंका देवकृष्णला त्याच्या रंगावरून वारंवार हिणवायची. "तू काळा आहेस, तू मला डिझर्व्ह करत नाहीस. माझ्या लायकीचा एखादा देखणा मुलगा हवा होता. तू मला खुश ठेवू शकत नाहीस, मला घटस्फोट दे," असे म्हणून ती देवकृष्णचा मानसिक छळ करायची. लग्नानंतर ती कधीच सासरच्या लोकांशी नीट वागली नाही.

४ वर्षांचे प्रेमप्रकरण आणि खिडकीतला 'तो' इशारा

कुटुंबाने केलेल्या दाव्यानुसार, प्रियंकाचे २०२० पासून कमलेश नावाच्या तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. ती सासरी असताना तिचा प्रेमी दर ३-४ दिवसांनी घराबाहेरून फेऱ्या मारायचा आणि प्रियंका तासनतास खिडकीत उभी राहून त्याला पाहत असे. मोबाईलवर तासनतास बोलणे आणि घरच्यांनी विरोध केल्यास भांडणे करणे हेच ती रोज करायची.

१ लाखाची सुपारी आणि लुटीचा बनाव

पोलिस तपासानुसार, प्रियंका आणि कमलेशला एकत्र यायचे होते, पण देवकृष्ण त्यांच्यात अडथळा ठरत होता. अखेर कमलेशने आपला मित्र सुरेंद्र याला १ लाख रुपयांची सुपारी देऊन देवकृष्णची हत्या करण्यास सांगितले. घटनेच्या रात्री देवकृष्ण गाढ झोपेत असताना सुरेंद्रने घरात शिरून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्रियंकाने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले आणि घरातील दागिने स्वतःच लपवून ठेवले, जेणेकरून हा दरोड्याचा प्रकार वाटेल. मात्र, सायबर सेल आणि फॉरेन्सिक टीमने तपास केला असता, घरात बाहेरून कोणीही जबरदस्तीने शिरल्याचे पुरावे मिळाले नाहीत. पोलिसी खाक्या दाखवताच प्रियंकाने गुन्ह्याची कबुली दिली.

बालविवाहाचा शाप आणि हत्येचे सत्र

तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे, देवकृष्ण आणि प्रियंका यांचा विवाह वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी झाला होता. सज्ञान झाल्यावर जेव्हा त्यांना एकत्र राहण्यास सांगण्यात आले, तेव्हापासून प्रियंकाने विरोध सुरू केला होता. ती ३ वर्षे माहेरात होती, मात्र समाजाच्या दबावामुळे तिला सासरी पाठवण्यात आले होते.

'नराधम सुनेला फाशी द्या'; आईची मागणी

माझ्या मुलाचा जीव घेणाऱ्या त्या सुनेला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी देवकृष्णची आई लक्ष्मीबाई यांनी केली आहे. गावकऱ्यांनी मध्यस्थी करून तिला नांदायला पाठवले, पण तिने घरातच मुलाला संपवण्याचा कट रचला होता, असे लक्ष्मीबाई यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी पत्नी प्रियंका आणि प्रेमी कमलेशला बेड्या ठोकल्या आहेत. हत्येसाठी १ लाखाची सुपारी घेणारा सुरेंद्र अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title : पत्नी ने प्रेमी के लिए पति को रंग के कारण मार डाला: एक भयानक कहानी

Web Summary : मध्य प्रदेश में, पत्नी प्रियंका ने अपने पति देवकृष्ण की हत्या रंग के कारण और प्रेम संबंध के चलते की। उसने और उसके प्रेमी ने एक हत्यारे को ₹1 लाख में काम पर रखा। पुलिस ने प्रियंका और उसके प्रेमी को गिरफ्तार किया, जिसमें दुर्व्यवहार और लूट का खुलासा हुआ।

Web Title : Wife Kills Husband Over Affair, Color Shaming: A Gruesome Tale

Web Summary : In Madhya Pradesh, a wife, Priyanka, murdered her husband, Devkrishna, due to an affair and constant insults about his skin color. She and her lover hired a hitman for ₹1 lakh. The police arrested Priyanka and her lover, revealing a history of abuse and a staged robbery.