बंगळुरूमधील अब्बीगेरे येथे एका महिला इंजिनिअरने कौटुंबिक वादाला कंटाळून आत्महत्या केली आहे. सुषमा असं या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुषमाचं लग्न पाच वर्षांपूर्वी पुनीत कुमार याच्याशी झालं होतं आणि त्यांना चार वर्षांचा एक मुलगाही आहे. सुषमाचे सासरच्या लोकांशी वारंवार खटके उडत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
सोलादेवनहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अब्बीगेरे येथे ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी सांगितलं की, घरात छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकदा भांडणं व्हायची. घटनेच्या दिवशी स्वयंपाक करण्यावरून सुषमा आणि तिची सासू कल्पना यांच्यात मोठा वाद झाला होता.
सुषमाच्या माहेरच्या लोकांचा असा आरोप आहे की, सासू तिला जेवण बनवू देत नव्हती आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरून तिचा मानसिक छळ करत होती. याच त्रासाला कंटाळून सुषमाने गळफास लावून आपलं जीवन संपवलं.
सुषमाच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर, सासरच्या मंडळींवर हुंडा छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पती पुनीत कुमार याला अटक केली असून, सासू कल्पना ही अद्याप फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. सोलादेवनहल्ली पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Web Summary : Bengaluru woman engineer, सुषमा, committed suicide due to family disputes. Husband arrested after her family alleged dowry harassment. A four-year-old son is orphaned.
Web Summary : बेंगलुरु में पारिवारिक कलह से तंग आकर सुषमा नामक एक महिला इंजीनियर ने आत्महत्या कर ली। दहेज उत्पीड़न के आरोप में पति गिरफ्तार। एक चार साल का बेटा अनाथ हो गया।