आपलेही झाले परके! वृद्धाला गोणीत भरून पार्सल करायला निघालं कुटुंब; 'असं' फुटलं बिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 10:25 IST2026-03-18T10:23:19+5:302026-03-18T10:25:27+5:30

काही लोकांनी एका व्यक्तीला चक्क गोणीत बांधून कुरिअर करण्याचा प्रयत्न केला.

bengaluru shocker family try to parcel man in sack courier staff alert police | आपलेही झाले परके! वृद्धाला गोणीत भरून पार्सल करायला निघालं कुटुंब; 'असं' फुटलं बिंग

फोटो - आजतक

कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. काही लोकांनी एका व्यक्तीला चक्क गोणीत बांधून कुरिअर करण्याचा प्रयत्न केला. व्यालिकावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. दोन ते तीन तरुण एका कुरिअर कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी सोबत आणलेली प्लास्टिकची एक मोठी गोणी पार्सल करायची असल्याचं सांगितलं. सुरुवातीला हे एखाद्या सामान्य पार्सलसारखंच वाटत होतं, मात्र कुरिअर कर्मचाऱ्यांना अचानक त्या गोणीत आत काहीतरी हालचाल होत असल्याचं जाणवलं.

संशय आल्याने कर्मचाऱ्यांनी जेव्हा ती गोणी उघडून पाहिली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या गोणीच्या आत एक वृद्ध व्यक्ती होती, जी श्वास घेण्यासाठी धडपडत होती. कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना बाहेर काढलं आणि पाणी देऊन त्यांची नीट विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेले इतर लोकही हैराण झाले.

गोणी घेऊन आलेले तरुण आपल्या मतावर ठाम होते. त्यांनी कर्मचाऱ्यांकडे ती गोणी पार्सल करण्याची मागणी लावून धरली आणि त्या बदल्यात पैसे देण्याचं आमिषही दाखवलं. यावरून कुरिअर कर्मचारी आणि त्या तरुणांमध्ये जोरदार वाद झाला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावलं. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आरोपींनी तिथून पळ काढला. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title : परिवार ने वृद्ध को बोरे में भरकर भेजने का प्रयास किया; साजिश विफल।

Web Summary : बेंगलुरु में, एक चौंकाने वाली घटना सामने आई जब एक परिवार ने एक वृद्ध व्यक्ति को बोरे में भरकर कूरियर करने का प्रयास किया। कूरियर कर्मचारियों ने आदमी को सांस लेने के लिए संघर्ष करते हुए पाया, जिससे अधिकारियों को सतर्क किया गया। संदिग्ध भाग गए; पुलिस सीसीटीवी फुटेज का उपयोग करके जांच कर रही है।

Web Title : Family tries to ship elderly man in a sack; plot foiled.

Web Summary : In Bengaluru, a shocking incident unfolded as a family attempted to courier an elderly man stuffed in a sack. Courier staff discovered the man struggling to breathe, alerting authorities. The suspects fled; police are investigating using CCTV footage.