रस्त्यावर महिला दिसताच धावत जाऊन घ्यायचा चुंबन, 'सायको किसर'ला पोलिसांनी घातल्या बेड्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 14:33 IST2025-06-11T14:31:49+5:302025-06-11T14:33:32+5:30
सार्वजनिक ठिकाणी महिलांना जबरदस्तीने मिठी मारून आणि चुंबन घेऊन त्यांचा विनयभंग करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

रस्त्यावर महिला दिसताच धावत जाऊन घ्यायचा चुंबन, 'सायको किसर'ला पोलिसांनी घातल्या बेड्या!
महिलांना त्यांच्या संमतीशिवाय बळजबरीने मिठी मारणे किंवा त्यांचे चुंबन घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, बंगळुरूमधून एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बंगळुरूमध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांना जबरदस्तीने मिठी मारून आणि चुंबन घेऊन त्यांचा विनयभंग करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. नदीम नावाच्या या व्यक्तीला 'सायको किसर' असे देखील संबोधले जात असून, त्याच्या कृत्यांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
महिलांचा पाठलाग करून केलं किस
नदीमने नुकतेच पुलकेशी नगर परिसरात दोन महिलांना बळजबरीने मिठी मारून त्यांचे चुंबन घेतले. त्यानंतर एका मोमोजच्या दुकानाजवळ उभ्या असलेल्या मुलीलाही त्याने चुंबन घेतले आणि पळून गेला. इतकेच नव्हे तर, ६ जून रोजी त्याने एका पार्कमध्ये एका महिलेचा पाठलाग करून तिला मिठी मारली आणि तिच्या ओठांचे जबरदस्तीने चुंबन घेतले. त्याच पार्कमध्ये त्याने दुसऱ्या एका महिलेलाही लक्ष्य केले.
पोलिसांनी केली अटक
पीडित महिलेने पुलकेशी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नदीमचा शोध सुरू केला. अखेर, त्याला बनसवाडी येथे अटक करण्यात आली. सध्या तो पुलकेशी नगर पोलिसांच्या ताब्यात असून, त्याची चौकशी सुरू आहे. या आधीही असाच प्रकार केल्याने नदीमला पोलिसांनी अटक केली होती.
केला धक्कादायक खुलासा!
पोलिसांच्या चौकशीत नदीमने धक्कादायक खुलासा केला की, तो मोठ्या प्रमाणात अश्लील चित्रपट पाहायचा आणि त्यातूनच त्याला महिलांना सार्वजनिक ठिकाणी जबरदस्तीने मिठी मारून आणि चुंबन घेऊन त्रास देण्याची कल्पना सुचली. विशेष म्हणजे, नदीम एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होता, परंतु काही महिन्यांपूर्वी त्याने नोकरी सोडल्याचेही समोर आले आहे.