डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 20:52 IST2025-10-19T20:46:21+5:302025-10-19T20:52:57+5:30
Husband Killed Wife Crime News: डॉक्टर पती-पत्नीचा एक धक्कादायक प्रकार पोलिस तपासातून समोर आला

डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
Husband Killed Wife Crime News: डॉक्टर पती-पत्नीचा एक धक्कादायक प्रकार बंगळुरूत समोर आला. पोलिसांनी तब्बल सहा महिन्यांनंतर २९ वर्षीय त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर कृतिका एम. रेड्डी या महिलेच्या मृत्यूचे धक्कादायक गूढ उलगडले. या हत्येमागे तिचा नवरा आणि विक्टोरिया हॉस्पिटलमधील गॅस्ट्रो सर्जन डॉक्टर महेंद्र रेड्डी असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी पती महेंद्र रेड्डी याला अटक केली आणि हत्येचे गूढ उकलले. पण हा सारा प्रकार कसा घडला, याबाबत पोलिसांनी माहिती दिली.
कसा घडला गुन्हा?
२६ मे रोजी कृतिका आणि महेंद्र यांचा विवाह झाला होता. परंतु लग्नानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. या वादांचा शेवट थरकाप उडवणाऱ्या हत्येने झाला. पोलिस तपासानुसार महेंद्रने आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा दुरुपयोग करून पत्नीला एनेस्थेशिया औषध प्रोपोफोल चा अतिमात्रेचा डोस दिला. हे औषध साधारणपणे शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्यासाठी वापरले जाते, पण अतिमात्रेत दिल्यास त्याने श्वासोच्छ्वास बंद होऊन मृत्यू होऊ शकतो.
गोड बोलून पत्नीचा काटा काढला...
कृतिका आपल्या वडिलांच्या मराठाहळ्ळी येथील घरी राहात असताना महेंद्रने 'वैद्यकीय सेवा' देण्याच्या बहाण्याने तिला इंजेक्शन दिले. पहिल्या इंजेक्शननंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. महेंद्रने तिला विश्रांती घ्यायला सांगितले आणि पुन्हा दोन दिवसांनी दुसरा डोस दिला. या दुसऱ्या इंजेक्शननंतर तिची प्रकृती झपाट्याने खालावली. रात्री उशिरा तिला इंजेक्शन देऊन तो बाहेर गेला आणि सकाळी कृतिका बेशुद्ध अवस्थेत सापडली. डॉक्टर असूनही त्याने विचित्र प्रकार केले आणि तिचा जीव घेतला.
फॉरेन्सिक अहवालानुसार, कृतिकाचा मृत्यू एनेस्थेशियाच्या घातक ओव्हरडोसमुळे झाला. पत्नीच्या विश्वासाचा गैरवापर करून स्वतःच्या व्यावसायिक कौशल्याने जीव घेणाऱ्या डॉक्टरला कठोर शिक्षा व्हावी, असा सूर सर्वत्र दिसून येत आहे.