Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 12:13 IST2026-04-12T12:11:58+5:302026-04-12T12:13:27+5:30
Lakshya Mishra : बंगळुरूच्या येलहंका न्यू टाउन येथील मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनच्या हॉस्टेलमध्ये १९ वर्षीय बी.टेक विद्यार्थी लक्ष्य मिश्राचा मृत्यू झाला. त्याचे वडील अंजनी मिश्रा यांनी प्रश्न उपस्थित करत मुलाची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.

Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
बंगळुरूच्या येलहंका न्यू टाउन येथील मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन (MAHE) च्या हॉस्टेलमध्ये १९ वर्षीय बी.टेक विद्यार्थी लक्ष्य मिश्रा याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचे वडील अंजनी मिश्रा यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत मुलाची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. लक्ष्य हा जमशेदपूरमधील कदमा भाटिया बस्ती येथील रहिवासी होता, तर त्याचं कुटुंब मूळचे बिहारच्या आरा जिल्ह्यातील आहे. या घटनेच्या एक दिवसानंतर, नातेवाईकांनी संस्थेवर सत्य लपवल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याला संशयास्पद मृत्यू मानून BNSS च्या कलम १९४ (४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्यवर ८ एप्रिल रोजी शवविच्छेदनानंतर बंगळुरूमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे नातेवाईक १० एप्रिलच्या रात्री जमशेदपूरला परतले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्य मिश्रा बी.टेक दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास तो गोविंदपुरा येथील कॉलेज हॉस्टेलच्या नवव्या मजल्यावरून खाली पडला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
बैंगलोर के मनिपाल कॉलेज में पढ़ने वाले लक्ष्य मिश्रा की मौत हो गई कॉलेज ने परिवार को बताया लक्ष्य की मौत हॉस्टल की नवी मंजिल से गिरने के कारण हुई
— Gaurav Pal (@GauravPalRaj) April 8, 2026
लेकिन लक्ष्य मिश्रा के पिता कॉलेज की कहानी को झूठा बता रहे हैं और कह रहे हैं उनके बेटे के साथ कोई बड़ा हादसा हुआ है जो कॉलेज छुपा रहा… pic.twitter.com/OdESDRAe4j
"खिडकीची रचना पाहता तिथून उडी मारणं शक्यच नाही"
कॉलेज प्रशासनाचा दावा आहे की लक्ष्यने आत्महत्या केली आहे. मात्र वडिलांनी हे फेटाळून लावले आहे. ते म्हणाले, "माझ्या मुलाने आत्महत्या केली असावी अशी एकही परिस्थिती दिसत नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होईल की तिथे आणखी कोण होतं. खिडकीची रचना पाहता तिथून उडी मारणं शक्यच नाही. हा एक कट असून त्याची चौकशी झाली पाहिजे, जेणेकरून दुसरा कोणताही मुलगा अशा मृत्यूचा बळी ठरणार नाही." अद्याप सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्यात आलेलं नाही आणि कोणतेही महत्त्वाचे पुरावे समोर आलेले नाहीत. रूममेटची अनुपस्थिती आणि त्याच्या जबाबातील विसंगती यामुळेही प्रश्न उपस्थित होत आहेत.
"रुग्णालयात मृतदेह पाहिला"
वडील अंजनी मिश्रा यांनी सांगितलं की, संस्थेने दिलेली माहिती आणि घटनास्थळाची प्रत्यक्ष स्थिती यात खूप फरक आहे. त्यांना सकाळी ३.३० च्या सुमारास मुलगा नवव्या मजल्यावरून पडल्याची माहिती फोनवरून देण्यात आली आणि अर्ध्या तासानंतर त्याच्या मृत्यूची पुष्टी केली गेली. जेव्हा त्यांनी रुग्णालयात मृतदेह पाहिला, तेव्हा शरीरावर जखमांच्या स्पष्ट खुणा नव्हत्या. मणिपालचे अधिकारी खरं बोलत नसल्याचा आरोप त्यांनी केला.