प्रेमात आड येणाऱ्या प्रेयसीच्या आईची प्रियकराने हत्या; सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 22:32 IST2021-07-14T22:26:40+5:302021-07-14T22:32:25+5:30
Murder Case : टिटवाळ्यात घडली धक्कादायक घटना

प्रेमात आड येणाऱ्या प्रेयसीच्या आईची प्रियकराने हत्या; सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
गेल्या काही दिवसांपासून टिटवाळा परीसरात गुन्हेगारी वाढली आहे. टिटवाळा पुन्हा एकदा एका गंभीर गुन्ह्यान हादरलाय. प्रेमात आड येणाऱ्या अल्पवयीन प्रेयसीच्या आईची प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक घटना टिटवाळ्य़ात घडलीय. या प्रकरणी आरोपी समीर दळवी याला टिटवाळा पोलिसांनीअटक केली असून अखेर 10 दिवसानंतर पोलिसांना या हत्येचे गूढ उकलण्यात यश आले.
टिटवाळा येथील इंदारनगर परिसरात सोनी देवराज शेरवे ही 39 वर्षीय महिला राहत होती. सोनी ही महापालिकेत कंत्रटी कामगार होती. 4 जुलै रोजी नेहमी प्रमाणे सोनी कामावर गेली. त्यानंतर तिनं आपल्या सावत्र मुलीला ती फळ घेण्यासाठी गुरवली येथे जात असल्याच सांगितलं. संध्याकाळी चार वाजेर्पयत सोनीचा मोबाईल सुरु होता. मात्र त्यानंतर तिचा मोबाईल स्वीच ऑफ झाला. ही बाब तिच्या मुलीने नातेवाईकांना सांगितली. नातेवाईकांनी सोनीचा शोध घेतल्यानंतर टिटवाळा पोलिस ठाण्यात सोनी ही बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. टिटवाळा पोलिस सोनीच्या शोधात असताना तिचा मृतदेह गुरवली परिसरात मिळून आला. मृतदेह सडला होता.
टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजू वंजारी यांनी या प्रकरणाचा तपासाकरीता काही पथके नेमली. सोनी हीच्या संपर्कात असलेल्या सर्व नातेवाईकांची पोलिासांनी विचारपूस केली. या दरम्यान पोलिसांना माहिती पडले की, सोनीची सावत्र मुलगी आणि समीर यांच्यात प्रेमसंबंध आहेत. काही दिवसापूर्वीच मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी समीर सोबत सोनीचे भांडण झाले होते. सोनी हीने समीरला सांगितले होती की, तुझी लायकी नाही. तुङयाशी माझा मुलीचे लग्न करणार नाही असा दम भरला होता. तपास अधिकारी विजय सूव्रे यांनी तपासाची सूत्रे फिरवून समीर याला ताब्यात घेत विचारपूस केली असता समीर याने त्याने केलेला गुन्हा कबूल केला.