Video : विलेपार्ल्यात विहिरीचा कठडा तुटून एका चिमुकलीसह दोन महिलांचा मृत्यू; 7 महिलांना वाचवण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 21:30 IST2018-10-02T20:44:35+5:302018-10-02T21:30:37+5:30
याबाबत विलेपार्ले पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काही महिला विलेपार्ले येथील रुईया बंगलो जवळील विहिरीवर असलेल्या लोखंडी जाळीवर बसून पूजा करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.

Video : विलेपार्ल्यात विहिरीचा कठडा तुटून एका चिमुकलीसह दोन महिलांचा मृत्यू; 7 महिलांना वाचवण्यात यश
मुंबई - एका धार्मिक कार्यक्रमासाठी काही महिला आज साडेसहा वाजताच्या सुमारास विलेपार्ले येथील रुईया बंगलो, दीक्षित रोड, सॅटेलाईट हॉटेलजवळ जमल्या होत्या. मात्र, या ठिकाणी पूजेचा कार्यक्रम सुरु असताना विहिरीचा कठडा तुटून विहिरीत काही महिला व मुले पडली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी पोचले आणि विहिरीत पडलेल्यांना बाहेर काढले. जखमींना व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. माधवी पांडे (वय - ४९), रेणू यादव (वय २०) आणि ३ वर्षीय दिव्या अशी मृतांची नावं आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
याबाबत विलेपार्ले पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काही महिला विलेपार्ले येथील रुईया बंगलो जवळील विहिरीवर असलेल्या लोखंडी जाळीवर बसून पूजा करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत सात महिलांना वाचविण्यात यश आलं असून अजून काही महिला अडकल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.