बसचे सीट पुढे घेण्यास सांगितल्याने प्रवाशाला बेदम मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 18:54 IST2019-03-02T18:50:16+5:302019-03-02T18:54:35+5:30

बसमधून प्रवास करत असताना, सीट पुढे घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला मारहाण केली.

beaten to traveller due to asked take bus seat forward | बसचे सीट पुढे घेण्यास सांगितल्याने प्रवाशाला बेदम मारहाण 

बसचे सीट पुढे घेण्यास सांगितल्याने प्रवाशाला बेदम मारहाण 

पिंपरी : बसमधून प्रवास करत असताना, सीट पुढे घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला मारहाण केली. साथीदारांच्या मदतीने  काळेवाडी येथे फिर्यादीला बसमध्ये लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यात फिर्यादीचा सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल तसेच सोन्याची अर्ध्या तोळ्याची अंगठी गहाळ झाली. ही घटना शुक्रवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास घडली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण प्रकरणी किसन गणपत बराटे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी हे आकाश ट्रॅव्हल्सच्या बसमधुन ( एमएच.१२. केएन. ७३९८) प्रवास करत होते. फिर्यादी यांनी प्रवासावेळी आरोपी वृषभ राखा यांना सिट पुढे घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपी राखा याने फिर्यार्दीला मारहाण, शिवीगाळ केली. बसमधील लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात मारला. बसमधील इतर दोन जणांनी फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. या वेळी फियार्दीचा मोबाईल तसेच अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी गहाळ झाली. वाकड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. 
 

Web Title: beaten to traveller due to asked take bus seat forward