कासारवाडीत पेट्रोलंपपावरील कामगारांना मारहाण करत चोरट्यांनी केला ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 14:06 IST2019-02-13T14:05:05+5:302019-02-13T14:06:52+5:30
कासारवाडी येथे प्रदीप बधे यांच्या मालकीचा साई गौरी पेट्रोलपंप आहे. या पंपावर दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

कासारवाडीत पेट्रोलंपपावरील कामगारांना मारहाण करत चोरट्यांनी केला ऐवज लंपास
पिंपरी : कासारवाडीतील पेट्रोलपंपावर कामगारांना दुचाकीवरून आलेल्या तीन आज्ञत चोरट्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील रोकड आणि मोबाईल पळवून नेला. ही घटना सोमवारी (दि.१३) सायंकाळी घडली. याप्रकरणी मंगळवारी भोसरी पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथे प्रदीप बधे यांच्या मालकीचा साई गौरी पेट्रोलपंप आहे. या पंपावर दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. पेट्रोलपंप कामगाराकडे पैशांची मागणी केली. त्याने नकार देताच, मारहाण करत त्यांच्याकडील ३३०० रूपयांची रोकड आणि ९०० रुपये किंमतीचा मोबाईल असा मिळुन ४२०० रुपयांचा ऐवज पळवून नेला. औदुंबर इंगळे या कामगाराच्या डोक्यात फायटरने मारले. त्याला गंभीर दुखापत करून चोरटे पळुन गेले. पेट्रोलपंपावर सेल्समन म्हणुन काम करणारे फुलचंद भास्कर जाधव (वय २३) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. भोसरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत