पिंपरीत गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन दोघांना बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 14:29 IST2019-03-09T14:28:14+5:302019-03-09T14:29:37+5:30

रस्त्याच्या मध्यभागी गाडी उभी करुन फोनवरुन बोलत असताना गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरुन चौघांनी दोघांना बेदम मारहाण केली...

beaten to Both peoples due to told take a vehicle side in pimpri | पिंपरीत गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन दोघांना बेदम मारहाण

पिंपरीत गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन दोघांना बेदम मारहाण

पिंपरी : रस्त्याच्या मध्यभागी गाडी उभी करुन फोनवरुन बोलत असताना गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरुन चौघांनी दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना पिंपरीतील बौद्धनगर येथे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. 
अभिजीत गायकवाड, अक्षय वाघमारे, स्वप्नील गाडे, जीवन गालफाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुणाल भाऊसाहेब रोकडे (वय १९, रा. बौद्धनगर, एमआयडीसी बिल्डिंग नं १५, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कुणाल व त्यांचे मित्र विठ्ठल वाघमारे हे घरी जात असताना आरोपी अभिजीत गायकवाड हा त्याची गाडी रस्त्याच्या मध्यभागी उभी करुन मोबाईलवर बोलत होता. त्यावेळी कुणाल यांनी त्यास गाडी बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने गायकवाड याने त्याच्या मित्रांना बोलावून घेत अभिजीतसह स्वप्नील गाडे व जीवन गालफाडे यांनी कुणाल व विठ्ठल वाघमारे यांना शिवीगाळ व मारहाण केली. तर अक्षय वाघमारे याने कुणाल यांच्या डोक्यात कोयता मारुन जखमी केले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: beaten to Both peoples due to told take a vehicle side in pimpri