शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

येरवडा कंटेन्मेंट झोनमध्ये पोलिसाला बेदम मारहाण, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 6:50 PM

भाजी विक्रीची गाडी बंद करण्यासाठी पोलीस कर्मचारी गेला होता..

ठळक मुद्देयाप्रकरणी 2 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे (विमाननगर ) : कंटेनमेंट झोन  मधील भाजी विक्रीची गाडी बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिस शिपायाला बेदम मारहाण केल्याची  गंभीर घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी पोलिस शिपाई विनायक मधुकर साळवे यांना मारहाण करणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा सह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. येरवडा कंटेनमेंट झोन मध्ये दोन महिन्यात पोलीस मारहाणीची ही तिसरी गंभीर घटना आहे. याप्रकरणी वसीम मोगले व  हैदरअली मोगले या बापलेकाला अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहेत. नावेद सौदागर, राहुल साळवे यांच्यासह दोन महिला आरोपी शमीम सय्यद व अम्रीन सय्यद हे चार आरोपी फरार आहेत.  येरवडा कंटेनमेंट झोनमध्ये आवश्यक भाजीपाला व किरकोळ विक्रीसाठी सकाळी नऊ ते दुपारी दोन अशी वेळ महापालिका आयुक्तांनी दिलेली आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर येथील जुन्या मोझे  शाळेसमोर भाजी विक्री करणाऱ्या नावेद सौदागर व राहुल साळवे यांना पोलीस शिपाई विनायक साळवे यांनी भाजी विक्री ची वेळ संपली असून हात गाडी काढून घेण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे सौदागर भाऊ साळवे यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी असणाऱ्या महिला शमीम सय्यद व अमरीन सौदागर यांच्यासह वसीम मोगले व हैदर अली  मोगले या सहा जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून पोलीस शिपाई विनायक साळवे यांना हाताने मारहाण केली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघा आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील चार आरोपी फरार असून त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत किरवे करीत आहेत.  येरवडा कंटेनमेंट झोनमध्ये तीन पोलिसांवर हल्ले - येरवडा कंटेनमेंट झोन मध्ये काम करणे पोलिसांसाठी अवघड झाले असून मागील दोन महिन्यात तीन पोलिसांवर हल्ले करण्यात आलेले आहेत. येरवडा पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ले झालेले आहेत. कंटेनमेंट  झोनमधील गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यातच जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते.

टॅग्स :YerwadaयेरवडाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी