Beat to hotel operator and waiter due to dining bill | हॉटेलमधील जेवणाच्या बिलावरून हॉटेलचालक, वेटरला मारहाण
हॉटेलमधील जेवणाच्या बिलावरून हॉटेलचालक, वेटरला मारहाण

ठळक मुद्दे खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : हॉटेलमधील जेवणाच्या बिलावरून चौघांनी लोखंडी रॉडने व लाकडी बांबूने डोक्यात मारून तिघांना जिवे ठार मारण्याचा उद्देशाने गंभीर जखमी केले. तसेच आणखी एकाला मारहाण करून किरकोळ जखमी केले. रावेत येथे हा प्रकार घडला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मोनू मदनचंद पाटील (वय १९, रा. रावेत, मूळ रा. सैनी, जि. कोसांबी, इलाहाबाद, उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. चंट्या, बारक्या, पिंट्या, युवराज (पूर्ण नाव माहीत नाही) अशी आरोपींची नावे आहेत. चौघे आरोपी शुक्रवारी (दि. ६) रात्री जेवणासाठी रावेत येथील गोकुळ हॉटेल येथे गेले होते. जेवणाच्या बिलावरून त्यांनी फिर्यादी मोनू याला मारहाण केली. त्याला सोडविण्यासाठी हॉटेलचालक कुणाल भेगडे व वॉचमन मनोजकुमार गेले. त्यावेळी फिर्यादी मोनू व कुणाल भेगडे व मनोजकुमार या तिघांनाही लोखंडी रॉड व लाकडी बांबूने डोक्यात मारून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच वेटर पिंटू गौतम यालाही किरकोळ जखमी केले. त्यानंतर आरोपी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून पळून गेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Beat to hotel operator and waiter due to dining bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.