शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार; घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 09:54 IST

Crime News : आपल्या मित्रांसोबत स्कूटीवर फिरायला गेलेल्या तरुणीचं काही तरुणांनी अपहरण केलं. आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. आपल्या मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये ही घटना समोर आली आहे. आपल्या मित्रांसोबत स्कूटीवर फिरायला गेलेल्या तरुणीचं काही तरुणांनी अपहरण केलं. आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच पीडित तरुणीला आणि तिच्या मित्रांना बेदम मारहाण करण्यात आली. 

तरुणी मित्रांसोबत फिरायला गेली असताना काही तरुणांनी त्यांना अडवलं आणि पीडित तरुणीला एका अज्ञातस्थळी नेलं. आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी इज्जतनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मे रोजी त्याची बहीण फिरण्यासाठी घराबाहेर पडली होती. तिचे दोन मित्र अर्णव आणि सागर घराबाहेर आले. त्यावेळी ती त्यांच्यासोबत बाहेर फिरायला गेली. इज्जतनगर परिसरातील भगवानपूर धिमरी येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने पीडित मुलगी आणि तिच्या मित्रांना थांबवले. 

मित्रांना जोरदार मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये ते दोघेही गंभीररित्या जखमी झाले. मदतीसाठी आरडाओरडा केला असता चाकूचा धाक दाखवत सर्वांना मारण्याची धमकी दिली आणि तरुणीचं अपहरण केलं. यानंतर एका अज्ञातस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित मुलगी खूपच घाबरलेली होती. तिने आपल्या कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला नाही. मात्र अखेर शनिवारी पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या बहिणीला सांगितला आणि त्यानंतर सर्वांनाच एक धक्का बसला. 

पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांसह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिक्षक रोहित सिंह सजवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपींच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अशा धक्कादायक घटना समोर येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस