शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
2
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
5
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
6
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
7
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
8
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
9
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
10
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
11
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
12
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
13
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
14
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
15
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
16
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
17
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
18
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
19
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
20
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

उत्तर प्रदेशनंतर राजस्थान, दोन अल्पवयीन मुलींवर तीन दिवस सामूहिक बलात्कार?

By बाळकृष्ण परब | Updated: October 1, 2020 14:13 IST

baran girls rape case : उत्तर प्रदेशातील हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असतानाच आता राजस्थानमदील बारां येथे दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देदोन अल्पवयीन मुलींना कोटा, जयपूर आणि अजमेर येथे नेऊन आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप पोलिसांना काही सांगितल्यास जिवे मारण्याची आरोपींनी दिली धमकी दोन्ही मुलींनी आपल्या जबाबामध्ये आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचे सांगितल्याचे बारां येथील पोलिसांचा दावा

जयपूर - देशभरात महिला आणि मुलींवर होत असलेले अत्याचार ही चिंतेची बाब बनले आहेत. उत्तर प्रदेशातील हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असतानाच आता राजस्थानमदील बारां येथे दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांकडून काहीही सांगण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप करण्यात येत आहे. दोन अल्पवयीन मुलींना कोटा, जयपूर आणि अजमेर येथे नेऊन आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप होत आहे. तसेच याबाबत पोलिसांना काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आरोपींनी सुरुवातीला दोन्ही अल्पवयीन मुलींचे अपहरण केले. त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपींनी सलग तीन दिवस या तरुणींवर बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे.याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार पीडित मुलींच्या वडिलांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस पीडित मुली आणि एका अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. यावेळी पीडित मुलींच्या वडिलांनी आपल्याला न्याय देण्याची विनंती केली. मात्र जेव्हा या मुलींना बोलण्यास सुरुवात केली तेव्हा आरोपींनी पोलिसांसमोरच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.पकडण्यात आलेल्या आरोपींना पोलिसांना सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या आरोपींनी कुटुंबीयांना किंवा पोलिसांना काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी पीडित मुलीना दिली आहे. दरम्यान, दोन्ही मुलींनी आपल्या जबाबामध्ये आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचे सांगितल्याचे बारां येथील पोलिसांनी सांगितले आहे. तसेच दोन्ही मुलींच्या वैद्यकीय चाचणीमध्ये बलात्काराला दुजोरा मिळाला नसल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर एसपींनी सांगितले की, जर पीडित मुलींच्या म्हणण्यानुसार त्यांना घाबरवून धमकावून जबाब घेतले गेले असतील तर पुढील कारवाईसाठी परवानगी घेऊन पुन्हा जबाब नोंदवले जातील.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही या मुलींवर बलात्कार झाला नसल्याचे तसेच या मुलींनी आपण स्वेच्छेने तरुणांसोबत फिरायला गेल्याचे आपल्या जबाबात म्हटल्याची माहिती दिली आहे. या घटनेची हाथरस येथील घटनेशी तुलना करणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचेही गहलोत यांनी म्हटले आहे. 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानRapeबलात्कार