Baramati municipality's loker breaks by thieves | बारामती नगरपालिकेची तिजोरी चोरट्याने फोडली
बारामती नगरपालिकेची तिजोरी चोरट्याने फोडली

ठळक मुद्दे१५ लाखाची रोख रक्कम लंपास 

बारामती : बारामती नगरपालिकेतील तिजोरी फोडून सुमारे १५ लाख रूपये चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी (दि. २६) मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकारानंतर बारामती शहरात खळबळ उडाली असून शहर पोलिसांनी घटनास्थळाची तातडीने पाहणी केली आहे. 
नगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील अकाऊंट विभागात असणाऱ्या कक्षाची काच काढून चोरट्याने थेट तिजोरी फोडली. धक्कादायक बाब म्हणजे इमारतीचा मुख्य दरवाजा व इतर दरवाजांनाही कुलूप नसल्याचे यावेळी निदर्शनास आले. तसेच सध्या मार्च एंडीगमुळे मोठ्याप्रमाणात असणारा भरणाऱ्या तिजोरीमध्ये ठेवण्यात आला होता.  तसेच रात्री साडेअकरापर्यंत येथील कार्यालयीन कामकाज सुरू होते, अशी माहिती मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी दिली.  येथील सीसीटीव्हीमध्ये चेहरा झाकलेला एक चोरटा आढळून आला आहे. रात्री कोणताही आवाज आला नाही, असे येथील सुरक्षा रक्षकाने सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 


Web Title: Baramati municipality's loker breaks by thieves
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.